सुनिल थोरात (वार्ताहर)
पुणे (हडपसर) : हडपसर मधील हडपसर येथील ग्लायडींग सेंटर संदर्भात नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे यांनी श्री डी सी शर्मा DGCA नवी दिल्ली यांना पत्राद्वारे निवेदन दिले.
सविस्तर माहिती अशी की हडपसर या ठिकाणी १९५० साली देशातील पहिले ग्लायडिंग सेंटर तात्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या शुभहस्ते चालू करण्यात आले होते. हे ग्लायडीग सेंटर देशातील पहिले ग्लायडिंग सेंटर असून ते चालू करण्यामागचा उद्देश सर्वसाधारण गरीब कुटुंबातील होतकरू तरुणांना ग्लायडीग सेंटरच्या माध्यमातून ग्लायडर विमान चालवण्याचे प्रशिक्षण तसेच प्राथमिक विमानाची माहिती मिळणे तसेच तत्सम गोष्टीसाठी सुरू करण्यात आले होते .

ज्या ग्लायडीग सेंटरच्या माध्यमातून मुलांना वैमानिक व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी मिळवून देणारे देशातील एकमेव ठिकाण गेल्या ७४ वर्षांमध्ये चालू स्थितीत आहे . या ग्लायडिंग सेंटर बरोबर देशांमध्ये सुमारे अन्य १८ ठिकाणी अशाच प्रकारची ग्लायडिंग सेंटर उभारण्यात आली होती ,परंतु ती सर्वच्या सर्व बंद अवस्थेत आहेत . या ग्लायडिंग सेंटरने गेल्या ७४ वर्षांमध्ये अनेक होतकरू गरीब मुलांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले असून यातून खूप चांगल्या संख्येने वैमानिक तयार झाले आहेत. ही केंद्र सरकारची अत्यंत कमी शुल्क मध्ये ही संधी मिळवुन देणारे देशातील एकमेव ग्लायडीग सेंटर चालू अवस्थेत असताना १३ डिसेंबर २०२४ रोजी THE INDIAN EXPRESS या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये हे सेंटर पीपीपी मॉडेल वर AIRPORT AUTHORITY OF INDIA ला ९९ वर्षाच्या कराराने हस्तांतरित होत आहे अशी बातमी छापून आली ,
ही बातमी छापून आल्यापासून हडपसर पंचक्रोशीच नव्हे तर या ठिकाणी संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारा गोरगरीब नवयुवक हा हवालदिल झाला असून १८७ रुपयांमध्ये ग्लायडीग मध्ये ग्लायडर विमानामध्ये बसण्याची व मोफत शिकण्याची त्याची संधी आता हिरावून घेतली जाणार आहे , या ठिकाणी व्यावसायिक पद्धतीने जर या जागेचे हस्तांतरण झाले तर मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबातील होतकरू तरुणांना ग्लायडर विमान चालवणे इत्यादी गोष्टी कमीत कमी पैशांमध्ये भविष्यात मिळणार नाहीत . हे सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी तरुण मोठी रक्कम देऊन या गोष्टी शिकू शकणार नाहीत तात्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी ज्या उद्देशाने १९५० साली ग्लायडिंग सेंटरची उभारणी केली आज पर्यंत हजारो तरुणांनी या ग्लायडीग सेंटर मधून शिकण्याचा अनुभव घेतलेला आहे.
तरी आम्हा सर्व हडपसरकर पुणेकर नागरिकांच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण सदरचे ग्लायडिंग सेंटर हे PPP मॉडेलवर AAI ला हस्तांतरित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे याचा आपण फेरविचार करावा व सदरचे ग्लायडीग सेंटर आहे त्याच पद्धतीने केंद्र सरकार तर्फे गोरगरिबांसाठी चालू ठेवावे उलट पक्षी या ग्लायडिंग सेंटरमध्ये अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात माहिती देऊन घालून सदरच्या सेंटरला जास्तीत जास्त भरीव आर्थिक मदत करून गोरगरीब कुटुंबातील हजारो नवयुवकांना आकाशामध्ये उंच उंच भरारी घेण्याची त्यांची इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे सेंटर चालू ठेवण्यात यावे अशी विनंती पत्राद्वारे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा