डॉ गजानन टिंगरे (वार्ताहर)
पुणे (इंदापूर) : परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चात सामील झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस स्टेशनमध्ये निर्घृण खून करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ जंक्शन व परिसरातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी (दि.18) रोजी लासुर्णे ते वालचंदनगर पोलीस स्टेशन असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनेक समाजाचे लोक सामील झाले व सर्व महापुरुषांच्या घोषणा देत हा मोर्चा वालचंदनगर पोलीस स्टेशन झाली.
त्या ठिकाणी निषेध सभा होऊन निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निषेध सभेत त्यात अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली व निषेधही नोंदवण्यात आला यात आसपासच्या सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही महापुरुषाच्या विटंबना यापुढे सहन केल्या जाणार नाहीत व दलित कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये योग्य न्याय मिळावा अशा प्रकारच्या मागणीही करण्यात आल्या तसेच सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या खुन करणार्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना किंवा संबंधितांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची ही मागणी करण्यात आली.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा