निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा २५ वा ऊस गळीत हंगाम सुरू…
हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते बाॅयलर अग्निप्रदिपन...

संपादक डॉ. गजानन टिंगरे
शहाजीनगर (ता. इंदापूर) : येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी (दि. २) उत्साहात करण्यात आला. कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचे औचित्य साधत बाॅयलर अग्निप्रदिपनाचा समारंभ कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
या प्रसंगी सत्यनारायणाची महापूजा कारखान्याचे संचालक महेशकुमार शिर्के व धनश्री शिर्के या उभयतांच्या हस्ते संपन्न झाली. धार्मिक वातावरणात झालेल्या या पूजेनंतर अग्निप्रदिपनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक मंडळाचे लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे यांच्यासह कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासात शेतकऱ्यांचा सातत्याने असलेला विश्वास आणि सहकार यामुळे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
Editer sunil thorat




