
पुणे (हवेली) : स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आज १०५ वर्षांचा इतिहास असलेल्या दि. पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, पुणे या नामांकित संस्थेच्या चेअरमनपदी उदयकुमार सुदाम काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सुमित लहू कदम, मानद सचिवपदी जमीर बाबालाल तांबोळी तर खजिनदारपदी दिनेश प्रल्हाद गडांकुश यांची निवड झाली आहे.
ही निवड संस्थेच्या संचालक मंडळाच्या पदाधिकारी बैठकीत, उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
संस्थेचा शतकाहून अधिक वारसा…
दि. पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणेची स्थापना २० जून १९२० रोजी झाली. स्थापनेपासून दर दहा वर्षांनी सरासरी १,००० नवीन सभासदांची भर होत गेली असून सध्या संस्थेकडे तब्बल १४,८८३ सभासद आहेत.
संस्थेचे एकूण भागभांडवल व संचित ठेवी मिळून सध्या ₹४०८ कोटी ५१ लाख आहेत. तर सभासद व सेवानिवृत्त सभासद यांच्या एकूण ₹८२ कोटी ४६ लाख इतक्या मुदत ठेवी आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल ₹३२८२ कोटी इतकी झाली असून पोलिस अधिकारी व अंमलदार यांना ₹९४९ कोटी १३ लाख इतके कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
संस्थेच्या महत्त्वाच्या योजना…
१. सर्वसाधारण कर्ज योजना – १ लाख मर्यादा, व्याजदर ९.४०%
२. तातडी कर्ज योजना – ५० लाख मर्यादा, व्याजदर ९.८०%
३. गृह कर्ज योजना – ५० लाख मर्यादा, व्याजदर ९.८०%
४. तारण कर्ज योजना – ५० लाख मर्यादा, व्याजदर ९.८०%
५. शैक्षणिक गुणवत्ता बक्षीस योजना –
१० वी व १२ वी मध्ये ९७% वरील गुण मिळविणाऱ्यांना लॅपटॉप
९५% वरील गुण मिळविणाऱ्यांना टॅब
पदवी / पदविका मध्ये ९७% वरील गुण मिळविणाऱ्यांना लॅपटॉप
९५% वरील गुण मिळविणाऱ्यांना टॅब
पुढील कार्यकाळाबाबत अपेक्षा…
नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून संस्थेची परंपरा कायम राखत अधिकाधिक सभासदाभिमुख योजना राबवण्याचा संकल्प नव्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
Editer sunil thorat




