
पटना : बिहारमध्ये महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ या नावाने नवीन योजना सुरू करण्यात आली असून, प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला सुरुवातीला १० हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली. त्यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट शेअर करत महिलांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरेल, असे नमूद केले.
महिलांना रोजगार व आर्थिक मदतीची हमी…
या योजनेअंतर्गत ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून महिलांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सप्टेंबर २०२५ पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
-
योजनेनुसार …
—सुरुवातीला १० हजार रुपये पहिल्या हप्त्यात दिले जातील.
—महिलांनी रोजगाराचा उपक्रम सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी गरजेनुसार २ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
—गावांपासून शहरांपर्यंत महिलांना उत्पादने विक्रीसाठी हाट बाजार विकसित करण्याची योजना सरकारने आखली आहे.
महिलांच्या स्वावलंबनासाठी पाऊल…
नितीश कुमार म्हणाले, “बिहारातील महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे. महिलांना घरापर्यंत रोजगार मिळेल आणि त्या कुटुंबाच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा उचलू शकतील.”
या निर्णयामुळे लाखो कुटुंबांतील महिलांना आर्थिक मदत मिळणार असून, त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन दारे खुली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat




