अवैध प्रवासी वाहतूकी विरोधात पोलीस प्रशासनाची धडक कारवाई ; सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार.
वाहतूक पोलिसांची अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई..; लोणी काळभोर.

पुणे (हवेली) : पूर्व हवेलीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून लोणी काळभोर वाहतूक विभागाकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच अवैध वाहतुकीवर यापुढे आणखीन कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांनी माहिती दिली आहे.
कवडीपाट टोलनाक्याजवळ लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी (ता.१८) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यास सुरवात केली. या कारवाईत रिक्षा, सिक्स सीटर व चारचाकी प्रवासी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये गाड्यांची कागदपत्रे, गाडी चालविण्याचा परवाना, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, ड्रेस कोड, ड्रायव्हिंग परवाना / बॅच, ट्रिपल सीट, राँग साईटने गाडी चालविणे व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली. या कारवाईत वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, काही वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच, काहींना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक कारवाई…
दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, थेऊर फाटा, येथुन खासगी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे तात्पुरती अवैध प्रवासी वाहतुकीस लगाम लागला असे म्हणता येईल. तरी पोलीस प्रशासन या कारवाईत किती नियमितता ठेवणार हे काळच ठरवेल.
ही कारवाई लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार, पोलीस हवालदार विकास ओव्हाळ, बापूराव बांगर, ज्ञानोबा बडे, बजरंग धायगुडे, सतीश टेंगळे, सचिन कांबळे, योगेश काकडे व महिला वाहतूक पोलीस मनीषा नरवडे यांच्या पथकाने केली आहे.



