
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती वार्ड क्र. ४, समता नगर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील देशभक्तीच्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विजय थोरात आणि सर्व समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त आयोजनात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात नंदू कैलास काळभोर (माजी सभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली, माजी अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका, माजी सरपंच – कदमवाकवस्ती ग्रामपंचायत) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वज फडकताच राष्ट्रीय गीताच्या स्वरांनी परिसर दुमदुमला. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा देत वातावरण भारावून टाकले.
या प्रसंगी समता नगर मधील माजी सदस्य राजाराम थोरात, माजी सदस्य शरीफ मामा पठाण, जाकीर सय्यद, शम्मी शेख, आजम सय्यद, असलम सय्यद, अण्णा वाघमारे, विशाल ओहोळ, रामू थोरात, नवनाथ थोरात, रामा थोरात, खंडू शिंदे, मुन्ना शेख, आकाश रिकेबे, महेश झंजे, महादेव कांबळे, हरी साळवे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका कविता कांबळे, पल्लवी निकाळजे, सर्व मदतनीस आणि अंगणवाडीतील विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गाणी, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय थोरात, समता प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी मोलाचे योगदान दिले. उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाचे स्मरण करत राष्ट्रनिष्ठा, ऐक्य आणि प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याची शपथ घेतली.
Editer sunil thorat






