
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कर्नल महेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
ध्वजारोहणानंतर महाविद्यालयातील एनसीसी छात्रसैनिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत शानदार संचलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना कर्नल महेंद्र पाटील म्हणाले, “भारतीय सैन्यातील सेवा जरी खडतर असली तरी देशासाठी योगदान देण्याचा आनंद आणि अभिमान याहून मोठा दुसरा नाही. भारताचे सैन्य दल सक्षम असून नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन शिंदुर’ मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून भारताने शत्रू राष्ट्रावर मोठा विजय मिळवला आहे. देशसेवेसाठी समर्पणाची संधी सैन्यात मिळते, त्यामुळे तरुणांनी सैन्यात भरती व्हावे.”
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांचे स्मरण करून दिले. “आपला देश विविधतेने समृद्ध आहे. संविधानातील मूल्यांचे पालन करून जबाबदारीने वागले तरच देशाच्या प्रगतीत आपले योगदान ठरेल,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनात सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्स प्रतीक माने आणि सूरज थोरात यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे…
चित्रकला स्पर्धा: प्रथम – बंटी बर्मन, द्वितीय – अपूर्वा जुन्नरकर, तृतीय – संतोष पलक
निबंध स्पर्धा: प्रथम – नेहा बोबडे, द्वितीय – अक्षदा चौगुले, तृतीय – चैताली गायकवाड
रांगोळी स्पर्धा: सृष्टी इंदलकर, सुप्रिया पोळ, सानिका शिंदे
काव्यवाचन स्पर्धा: प्रथम – पूर्वा ताकतोडे, द्वितीय – श्रेयस बाबर, तृतीय – प्रतिक्षा शिंदे
वक्तृत्व स्पर्धा: प्रथम – ऋतुजा कुर्हाळे, द्वितीय – पूर्वा ताकतोडे, तृतीय – पल्लवी दिवेकर
तसेच जिल्हा स्तरीय गुणांकन निकषानुसार राज्यस्तरासाठी ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून प्रा. संध्याराणी आटोळे यांची निवड झाल्याबद्दल आणि खडतर प्रसंगी दाखवलेल्या साहसाबद्दल सिक्युरिटी कर्मचारी संजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोलकर, कॅप्टन डॉ. धीरजकुमार देशमुख, शा. शि. संचालक प्रा. ऋषिकेश कुंभार, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी औटी यांनी केले.
Editer sunil thorat








