
पुणे (हडपसर) : निबंध स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःला व्यक्त होण्याची आणि आपले विचार मांडण्याची संधी राजे क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होती. निबंध स्पर्धेसाठी “भारताचा खरा शत्रू कोण?”, “सध्याच्या राजकारणामध्ये सुशीक्षीत तरुणांची भूमिका” व “हुंडा-एक शापित आशीर्वाद” यापैकी एका विषयावर स्पर्धकांनी त्यांचे विचार मांडायचे होते.
६ जून पर्यंत स्पर्धकांनी त्यांचे निबंध ऑनलाइन पद्धतीने राजे क्लब ट्रस्ट च्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवायचे होते. यामध्ये सुमारे २५० स्पर्धकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभाग नोंदविला होता.
या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. अस्मिता सागर पळशीकर व डॉ. रसिका अभिषेक ताकवणे यांनी पटकाविला. तसेच द्वितीय क्रमांक चि. आर्यन चंद्रकांत कदम व श्री. प्रशांत बोरे आणि तृतीय क्रमांक सौ. अमृता संदीप पंडित व केतकी चोपडे याना मिळाला. १४ जून रोजी विजेत्या स्पर्धकांना राजे क्लबच्या वतीने रोख रक्कम व सन्मान चिन्ह बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच चांगले निबंध लिहिलेल्या ४० स्पर्धकांना उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह आयोजकांच्या वतीने देण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा ममता शिवतारे-लांडे, हडपसर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, मांजरी मा. सरपंच शिवराज घुले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तुषार हंबीर, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश कामठे, शिवसेना नेत्या निर्मला मेमाणे, हेमलता पडवळकर, राजे क्लब महिला बचत गट पदाधिकारी व सदस्य, भुजंगराव शेवाळे, बाळासाहेब भंडारी, विजय सोनवणे, ज्ञानेश्वर कटरे, दीपक ढोरे, निबंध स्पर्धेमधील विजेते व राजे क्लब चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध कलागुण अंगीकृत केले पाहिजे आणि असे उपक्रम नक्कीच त्यासाठी हातभार लावत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले म्हणाले.
या स्पर्धेच्या निमित्ताने नागरिकांना विविध विषयांवर निष्कर्ष काढण्याची संधी मिळणार असून समाज सुदृढ होण्यास हातभार लागेल असा विश्वास आम्हाला वाटतो असे शेवाळवाडी गावचे माजी उपसरंच अमित पवार म्हणाले.
सर्व निबंधांचे एक छोटेसे पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून द्यावे असे ममता शिवतारे लांडे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल बावणे यांनी केले व आभार अर्चना पवार यांनी मानले.
मुख्य संपादक सुनिल थोरात



