क्राईम न्युज

बनावट जन्म प्रमाणपत्र, बनावट आधार कार्ड अन् खाजगी कंपनीत काम…

पुण्यातून तीन बांगलादेशींना अटक..

पुणे : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी तळेगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्यास केल्याप्रकरणी नुकतीच अटक केली आहे. (Three Bangladeshi infiltrators arrested from Pune for illegally residing in India)

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाचे (एटीसी) पोलीस हवालदार रोशन पगारे यांना एका खासगी कंपनीत तीन बांग्लादेशी नागरिक काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका खोलीवर छापा टाकून ३० डिसेंबर रोजी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. हुसैन शेख (३१), मोनिरुल गाझी (२६) आणि अमीरुल सना (३४) अशी पोलिसांनी ओळख पटवलेल्या तिघांची नावे आहेत. भारतीय न्याय संहिता (बीएनएस), पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायदा या कलमांखाली आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले की, पोलिसांनी आरोपींकडून आधार कार्ड आणि भारतीय पॅन कार्ड जप्त केले आहे.

दहशतवाद विरोधी ब्युरोचे पोलीस निरीक्षक व्हीडी राऊत म्हणाले की, एका संशयिताकडून बांगलादेशी पासपोर्ट, बांगलादेशी जन्म प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यावरून संशयित बांगलादेशचे मूळ रहिवासी असल्याचे दिसून येते. या आरोपींनी चार वर्षांपूर्वी कोणत्याही आवश्यक परवानगी आणि कागदपत्रांशिवाय पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींनी सुरुवातीला बनावट भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यानंतर आधार व पॅन कार्ड मिळविण्यासाठी या जन्म प्रमाणपत्राचा वापर केला. यानंतर आरोपींनी तळेगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी केली. या तिन्ही आरोपींनी गुरुवारी (२ जानेवारी) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपी काम असलेल्या खासगी कंपनीत यापूर्वी बांगलादेशमार्गे भारतात घुसलेले म्यानमारमधील काही रोहिंग्या नागरिक काम करत होते. त्यामुळे या कंपनीत बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना नोकऱ्या मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा सध्या शोध सुरू आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??