तुळशीराम घुसाळकर / पुणे
पुणे (बारामती) : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ह़ोळ येथे मन हेलावून करणारी घटना घडली. इथे एका इसमाने ९ वर्षे वयाचा मुलगा अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तु तुझे आईचे वळणावर जावुन माझी इज्जत घालवणार या शुल्लक कारणावरून वडिलांनी त्याला भिंतीवर आपटुन त्याचा गळा दाबुन खुन केला.
त्यानंतर पोटच्या मुलाच्या खुनाचा गुन्हा लपवुन तो चक्कर येवुन पडल्याने मयत झाल्याचा बनाव करून अंत्यविधी करू पाहणा-या वडील, आज्जी व चुलत चुलते यांना खुनाचे गुन्हयाची उकल करून १२ तासात अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे हद्दीत होळ या गावात सदर घटना घडली असून यामध्ये पियुष विजय भंडलकर याचा खून झाला असून त्याचा खून केल्याचे कारणावरून त्याचे वडील विजय गणेश भंडलकर, आज्जी शालन गणेश भंडलकर, व चुलत चुलते संतोष भंडलकर यांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटना १४ जानेवारी रोजी घडली असून तो चक्कर येवुन पडल्याने मयत झाल्याचा बनाव करून त्यास प्रथम जगताप हॉस्पीटल वडगाव निंबाळकर येथे घेवुन गेले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला बारामती हॉस्पीटल येथे घेवुन जाण्यास सांगुनही त्याचे वरील नातेवाईक यांनी त्यास निरा येथील डॉ. भट्टड यांचे हॉस्पीटलला घेवुन गेले. डॉक्टरांनी पियुष यास तपासुन त्याचा मृत्यु झाला असल्याचे सांगुन त्यांना होळ येथील सरकारी दवाखान्यात घेवुन जाण्यास सांगीतले. परंतु वरील नातेवाईक यांनी पियुष यास अंत्याविधी करीता होळ येथे घरी घेवुन जावुन त्यानंतर गावातील लोकांना तो चक्कर येवुन पडुन मयत झाला आहे. असा खोटा बनाव करून नातेवाईकांना बोलावुन अंत्याविधी करण्यासाठी घाई गडबडीत स्मशान भुमी होळ येथे घेवुन गेले.
या घटनेची गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी API सचिन काळे यांना मिळालेने त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शना खाली राहुल साबळे व पोलीस हवालदार महेश पन्हाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, नागनाथ परगे, निलेश जाधव यांना सदर ठिकाणी जावुन घडलेला प्रकार काय आहे त्याची चौकशी करून पियुष याचे बॉडीचा पंचनामा करून डॉक्टरांनकडुन पोस्टमार्टम करण्याच्या सुचना दिल्या. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता PSI राहुल साबळे व पोलीस हवालदार महेश पन्हाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, नागनाथ परगे, निलेश जाधव असे होळ येथील स्मशानभुमीत गेले असता तेथे पियुषचे अंत्यविधीची संपुर्ण तयारी झाली होती. तेव्हा तेथे उपस्थित नातेवाईक व काही गावकरी यांनी पियुष याची बॉडी हालवण्यास नकार दिल्याने काही काळ तेथे तणाव निर्माण झाला होता. त्यांना शांत करून परिस्थितीचे गांभीर्य समजावुन सांगण्यात उपस्थित पोलीसांनी आपले संपुर्ण कौशल्य पणाला लावुन संयमाने व चातुर्याने मयत मुलगा पियुष याची बॉडी ताब्यात घेवुन सोबत काही त्याचे जवळचे नातेवाईक घेवुन सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल बारामती येथे घेवुन जावुन वैदयकीय अधिकारी यांचेकडुन पोस्टमार्टम केले असता डॉक्टरांनी पियुष याचे गळयावर दाब दिल्याने मृत्यु झालेबाबत स्पष्ट लेखी अभिप्राय दिलेने सदर अभिप्रायाबाबत गोपनीयता ठेवुन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनाने पियुष याची बॉडी त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात अंत्यविधी करण्यासाठी रितसर दिली.
त्यानंतर अंत्यविधी पार पडु दिला व सर्वजन आपापले घरी निघुन गेले नंतर एक एक संशयीत ताब्यात घेवुन पुढील तपास सुरू करून API सचिन काळे यांनी त्यांचे स्टाफ सह सखोल तपास केला असता यातील मयत मुलगा पियुष यास त्याचे वडील विजय गणेश भंडलकर यांनी तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतोस, तु तुझे आईचे वळणावर जावुन माझी इज्जत घालवणार असे म्हणत पियुष यास भिंतीवर आपटुन त्याचा गळा दाबुन खुन केला त्यावेळी पियुष याची आज्जी शालन गणेश भंडलकर यांना झाले प्रकाराबाबत माहीती असताना मुलगा विजय गणेश भंडलकर याचे सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवुन पडला आहे अशी खोटी माहीती गावातील लोकांना व डॉक्टरांना दिली व संतोष भंडलकर याने देखील त्याला सर्व घडले प्रकाराबाबत माहीती असताना त्याने देखील विजय गणेश भंडलकर याचे सांगणेवरून निरा येथील भट्टड डॉक्टरांना चक्कर येवुन पडल्याचे सांगुन त्या तिघांनाही भट्टड डॉक्टर यांनी मयत बालक पियुष यास होळ येथील सरकारी दवाखान्यात घेवुन जाण्याबाबत सांगीतले असताना देखील यातील पियुष याचे वडील विजय गणेश भंडलकर, आज्जी शालन गणेश भंडलकर, व चुलत चुलते संतोष भंडलकर यांनी संगणमताने जाणीवपुर्वक विजय भंडलकर याने पियुष यास भिंतीवर आपटुन गळा दाबुन खुन केला ही माहीती कोणालाही कळता कामा नये व त्याचा पुरावा राहता कामा नये यासाठी पियुष याची मयत बॉडी होळ येथील सरकारी दवाखान्यात घेवुन न जाता घरी होळ येथे घेवुन जावुन त्याचे मृत्यु बाबत कोणालाही खबर न देता नातेवाईकांना बोलावुन घेवुन त्याचे मृत्युचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पोस्टमार्टम न करता त्याचे अंत्यविधीची तयारी केली आहे.

वरिल सर्व प्रकार पोलीस तपासात उघड झाल्याने त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा. रजि. नंबर २९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १०३(१),२३८,३(५), प्रमाणे दिनांक १५/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करून यातील ९ वर्षांचे मयत मुलगा नामे पियुष विजय भंडलकर याचे वडील विजय गणेश भंडलकर, आज्जी शालन गणेश भंडलकर, व चुलत चुलते संतोष भंडलकर सर्व रा. होळ ता. बारामती जि. पुणे यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली असुन पुढील अधिक तपास पीएसआय राहुल साबळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोसई राहुल साबळे, सहा फौ. बाळासाहेब कारंडे स्था.गु.शा, पोलीस हवालदार अनिल खेडकर, सागर देशमाने, महेश पन्हाळे, सुर्यकांत कुलकर्णी, भाउसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, तौफीक मणेरी, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, भानुदास सरक, विकास येटाळे, निलेश जाधव, महीला पोलीस अंमलदार प्राजक्ता जगताप, रजनी कांबळे, प्रियंका झणझणे यांनी केलेली आहे सदर गुन्हयांचा पुढील तपास राहुल साबळे हे करीत आहेत
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा