शिक्षण

इंदापूर महाविद्यालयात इयत्ता १२ वी परीक्षार्थ्यांचे उत्साहात स्वागत..

डॉ गजानन टिंगरे / इंदापूर

पुणे (इंदापूर) : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा आज दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. या परीक्षार्थ्यांचे इंदापूर महाविद्यालयामध्ये उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले , संस्थेचे सचिव ॲड.मनोहर चौधरी तसेच संस्थेचे सर्व संचालक यांनी परीक्षार्थींना शुभेच्छा संदेश दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे व सर्व मान्यवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले व त्यांना या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’ सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत.इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता सकारात्मक वृत्तीने परीक्षेस सामोरे जावे व यशस्वी व्हावे. प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,’ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षाकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.’

यावेळी कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर , विज्ञान विभाग प्रमुख डॉ.शिवाजी वीर, क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड , प्रा.आत्माराम फलफले, डॉ.राजाराम गावडे, प्रा. श्रीनिवास शिंदे, डॉ. शितल पवार , प्राध्यापिका सुवर्णा जाधव, प्रा. श्याम सातार्ले, प्रा.रवींद्र साबळे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले. आभार प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??