केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा संसदेत खुलासा…

नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची आतुरतेने वाट पाहत असलेली ८व्या वेतन आयोगाची प्रक्रिया अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. याबाबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी १२ ऑगस्ट रोजी राज्यसभेत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले.
आयोग स्थापनेत उशीर का?
सूचना मागवणे सुरू : १७ जानेवारी व १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कार्मिक व प्रशिक्षण विभाग आणि सर्व राज्यांना त्यांच्या सूचना पाठवण्यासाठी पत्रे पाठवण्यात आली.
अधिसूचना प्रलंबित : सर्व सूचना मिळाल्यानंतरच आयोगाची अधिसूचना जारी होईल.
अध्यक्षांची नियुक्ती : अधिसूचना निघाल्यानंतरच अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक होणार.
अंमलबजावणीची शक्यता…
केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये ८व्या वेतन आयोगास मान्यता दिली.
शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता.
अहवाल तयार होऊन मंजुरीसाठी १.५ ते २ वर्षे लागू शकतात.
वाढीव वेतन थकबाकीसह मिळण्याची शक्यता.
फिटमेंट फॅक्टरचा अंदाज…
७व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता.
यावेळी १.९२ ते २.८६ दरम्यान असण्याचा अंदाज.
उदाहरण : सध्याचा पगार ₹३०,००० असल्यास, फिटमेंट फॅक्टर २.५७ प्रमाणे नवा पगार ₹७७,१०० होऊ शकतो.
Editer Sunil thorat




