सावकाराने ५ लाखांच्या मोबदल्यात २१ लाख वसूल करूनही महिलेचा विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ ; दोघांवर गुन्हा…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथे दुकानाचे नुतनीकरण करण्यासाठी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या मोबदल्यात खाजगी सावकाराने तब्बल २१ लाख रुपये वसूल केले. तरीही आणखी पैशाची मागणी करून न दिल्याने घरातील महिलेचा विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ आणि कुटुंबीयांना दमदाटी.
सन २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडलेल्या या प्रकरणी राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर) व विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी, सावकारी व विनयभंगासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल.
आरोपींनी फिर्यादीच्या मुलांची बुलेट अडवून चावी काढून दमदाटी केली. दुकानासमोर कार आडवी लावून “आम्हाला शहाणपण शिकविता काय?” अशी शिवीगाळ. पतीने मध्यस्थी केली असता “तुझ्याकडे पैसे नसतील तर बायकोला दुसऱ्या धंद्यात घाल” असे अश्लील वक्तव्य करून महिलेला लज्जित केले.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Editer sunil thorat




