
पुणे (हवेली) : वीज महावितरण ने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने नवीन डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे.
सलग तीन महिने ऑनलाईन पद्धतीने वीज भरणा केल्यास विजेत्या ग्राहकांना बक्षीस मिळू शकते. अशा प्रकारे योजना सुरू करुन ग्राहकांनी वीज भरुन सहकार्य करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.
त्याच अनुषंगाने या योजनेचा पहिला लकी ड्रॉ निघाला असून त्यामध्ये उरुळी कांचन उपविभागातील पाच लकी ग्राहकांना स्मार्ट मोबाईल फोन व स्मार्ट वॉच मिळाले आहेत. यामधील तीन ग्राहक हे लोणी काळभोर गावातील आहेत.
यामध्ये दिलीप गजेंद्र पालवे यांना स्मार्टफोन बक्षीस मिळाला आहे आणि स्मार्टवॉच हे संजय उत्तमराव काळभोर आणि पूजा अर्जुन कोराळे यांना महावितरण कडून बक्षीस मिळाले आहे. जुलै महिन्यात कमल राज पुरोहित, देवीदास बोराटे, दुर्गा सपकाळ (मोबाईल) परमेश्वर गायकवाड (स्मार्ट watch) मीळाले आहेत. तरी लोणी काळभोर कदमवाकवस्ती परिसरातील वीज वितरणाच्या सर्व ग्राहकांना महावितरण या माध्यमातून आव्हान करते की रांगेत उभा राहणे टाळा आणि ऑनलाइन पद्धतीने विज बिल भरा व लकी विजेते व्हा.
तसेच अधिकृत संकेतस्थळा वरुन वीज बिल भरावे अणि आपली फसवणूक टाळावी. महावितरण लोणी काळभोर शाखा, उरुळी कांचन उपविभाग आवाहन करत आहे.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात







