भाजप प्रदेश व जिल्हा अध्यक्ष निवडीनंतर निवडणुकांच्या रणधुमाळीत नवी कार्यकारिणी जाहीर ; बारामतीत भव्य कार्यक्रमात यादीचे प्रकाशन…
भाजप ओबीसी मोर्चा पुणे दक्षिण कार्यकारिणी 2025 जाहीर; संघटन बळकटीसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी...

डॉ गजानन टिंगरे
बारामती (पुणे) : भाजप प्रदेश आणि जिल्हा अध्यक्ष निवडीनंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी मोर्चा पुणे दक्षिण विभागाची 2025 ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती देताना ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे म्हणाले की, “प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांतदादा पाटील आणि राजेशदादा पांडे यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करून पक्ष वाढीचा व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. जिल्हा समन्वयक आमदार राहुलदादा कुल आणि जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे दक्षिण विभागातील नूतन पदाधिकारी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.”
ही कार्यकारिणी जाहीर करण्याचा कार्यक्रम बारामती येथील राधाकृष्ण हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब गावडे, नेते नवनाथ पडळकर, बाळासाहेब गरुड, सचिन लंबाते, आकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या नव्या कार्यकारिणीत दौंड, बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला यासह पुणे दक्षिण विभागातील जवळपास सर्व तालुक्यांतील सक्रिय ओबीसी कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे. “संगठन बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांत पक्ष बळकट व्हावा यासाठी नव्या चेहऱ्यांना व अनुभवी कार्यकर्त्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात या कार्यकारिणीची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल,” असे गजानन वाकसे यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या धोरणांचा प्रसार जनतेपर्यंत नेण्याचे आवाहन केले.
Editer sunil thorat



