देश विदेशमहाराष्ट्रराजकीय

यूकेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये महाराष्ट्राचा आवाज दणदणला ; सीईओ मित्रमंडळींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांचे प्रभावी सादरीकरण…

लंडन / मुंबई : युनायटेड किंगडममधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे आयोजित इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (IOD) इंडिया – Annual Global Convention व Global Business Meet 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी भारत-यूके सहकार्याच्या जागतिक प्रभावावर प्रभावी भाष्य करत सभागृहात ठसा उमटवला.

प्रवीण परदेशी यांनी आपल्या भाषणात ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी – अ‍ॅस्ट्राझेनेका एलपी यूएस – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या त्रिपक्षीय सहयोगाचा उल्लेख करत, कोविड लसीचे फ्रंटियर टेक्नॉलॉजीने विकास कसा घडला हे विशद केले. “मॉडर्ना” सारख्या स्पर्धकांच्या तुलनेत अवघ्या १०% किमतीत २ अब्जांहून अधिक डोस तयार करणे शक्य झाले. भारत-यूके सहकार्याचे हे सर्वात मोठे जागतिक उदाहरण आहे,” असे त्यांनी नमूद केले.

त्याचबरोबर ग्रीन एनर्जी, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक व उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये भारताला प्रचंड संधी असून, महाराष्ट्र व भारताने यूकेकडून उपलब्ध स्वस्त भांडवलाचा योग्य वापर करून मोठ्या प्रमाणावर हरित पायाभूत सुविधा उभारण्याची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या जागतिक मंचावर भारतीय उद्योगविश्वातील नामवंत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते—
वेणू माधव (Nandan Therapeutics), वीर टेक्नॉलॉजीज, विजय बोलिनेनी ग्रुप, राइन अबिन, डॉ. अजयकुमार सी.जे., केंब्रिज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, बॉम्बे मेटल एक्सचेंजचे तुषार गुंडेरिया, ब्लू डार्ट, विजय कारिया (Ravin Group), कृष्ण प्रसाद (Granules India), अँजेलो जॉर्ज (Bisleri International), Dunlop Aircraft Tyres, काशी विश्वनाथ पन्याम, अशोक कपूर, मुकुलिका मुखर्जी, मनोज के. राऊत, अदार पूनावाला व Clean City Initiative प्रतिनिधी इत्यादी.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विकास, गुंतवणूक, हरित ऊर्जा, डिजिटल गव्हर्नन्स या क्षेत्रांतील संधी जगासमोर ठेवत म्हटले—
“भारत-यूके भागीदारी ही केवळ आर्थिक नव्हे, तर मानवाला संरक्षण देणाऱ्या जागतिक नाविन्यांची पायाभरणी आहे.”

हाऊस ऑफ लॉर्ड्समधील हा कार्यक्रम भारत-यूके उद्योग व तंत्रज्ञान सहकार्यासाठी ऐतिहासिक मानला जात असून, महाराष्ट्राने जागतिक चर्चेत स्वतःचे नेतृत्व ठळकपणे सिद्ध केल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??