हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला ; संतप्त समाज संघटना व शिवप्रेमींच्या दबावाने प्रशासनाला माघार, पुतळ्याचे दुग्धाभिषेकासह पुनर्स्थापन…

हवेली (पुणे) : 17 नोव्हेंबर 2025 हवेली तालुका कचेरीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने रातोरात, कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी प्रक्रिया न पाळता हटविल्याच्या धक्कादायक प्रकाराविरोधात आज दिवसभर वातावरण ढवळून निघाले. शिवप्रेमी, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तहसील कार्यालयावर धडक दिली. अखेर दडपणाला न जुमानता प्रशासनाने सायंकाळी घाईघाईत पुतळ्याची प्रतिमा समाज संघटनांना परत देत नमते घेतल्याने प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले.
सकाळी तहसीलवर धडक—उमाजी नाईक संघटनेच्या नेतृत्वाखाली कडक निषेध…
छत्रपतींच्या पुतळा हटविण्याच्या विरोधात सकाळी हवेली तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब गंगाराम चव्हाण, सचिव सुनील शिवाजी जाधव, पदाधिकारी उत्तम धनवटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटने सोबत बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल निकम, शिवसेनेचे चंदन साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत देशमाने, हर्षवर्धन रेपे यांच्यासह अनेक स्थानिक नेते व शिवप्रेमी निषेधासाठी दाखल झाले.
या आंदोलनाला पुणे शहरातील कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. शहरप्रमुख संजय मोरे, चंदन साळुंखे, संदीप गायकवाड, आंबा बालगुडे, सनो गवते, जावेद खान, ज्ञानंद कोंढरे, किशोर रजपूत, पंकज बरीदे, सुशिल चिंचवले, वैभव कदम, निरज नांगरे, अमर मारटकर, अमित परदेशी, दिलीप पोमण, अतुल दीघे, निलेश पवार, संजय पासलकर, चिंतामण व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पुतळा रात्रीच का हटवला?’ — प्रशासनावर थेट संशय, गंभीर प्रश्नांची मालिका…
पुतळा हटवण्याबाबत संघटनांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत काही थरारक प्रश्न उपस्थित केले :
—पुतळा हटवण्याचे आदेश नेमके कोणी दिले?
कोणते अधिकारी उपस्थित होते आणि कोणत्या परवानगीने हटविण्यात आला?
—परवानगी होती तर दिवसा हटविण्यात अडचण काय होती?
—रात्रीचा वेळ आणि गुप्त पद्धत का निवडली?
—हा “घाट” नक्की कोणासाठी घातला गेला?
या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनांनी तीव्रतेने केली आहे.
सायंकाळी नाट्यमय परिवर्त, प्रशासनाला माघार, शिवरायांची प्रतिमा परत…
सकाळचा निषेध तापत गेल्यानंतर सायंकाळी प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. आंदोलक शिवप्रेमींच्या प्रचंड दबावामुळे तहसील प्रशासनाने नमते घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा समाज संघटनांना परत दिली.
दुग्धाभिषेक, भूमिपूजन व प्राणप्रतिष्ठा—शिवरायांचा पुतळा जागेवर पुन्हा प्रतिष्ठित…
प्रतिमा मिळाल्यानंतर शिवप्रेमींनी:
दुग्धाभिषेक
भूमिपूजन
मंत्रोच्चारासह प्राणप्रतिष्ठा
अशा विधीपूर्वक पारंपरिक पद्धतीने पुतळा पुन्हा पूर्वीच्या जागेवर प्रतिष्ठित केला. यावेळी परिसरात घोषणांनी वातावरण दणाणून गेले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषामुळे संपूर्ण तहसील परिसर शिवमय झाला.
पुढील आंदोलनाची शक्यता संघटनांनी स्पष्ट केले की “पुतळा हटवण्यामागील सूत्रधार, आदेश देणारे अधिकारी आणि रात्रीची कारवाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही.”
त्यामुळे येत्या दिवसांत हवेली तहसील परिसरात आणखी मोठे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वत्र प्रश्नचिन्हे निर्माण झाली असून जनतेत संतापाची लाट आहे.
Editer sunil thorat








