
किवळे (पुणे) : किवळे येथील लीगसी इंपिरियल गृहनिर्माण संस्थेत बालदिन उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच सोसायटीचा ताबा हाती घेतलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांसह सर्व सभासदांनी मिळून हा उपक्रम सुंदररीत्या राबवला.
बालदिनानिमित्त सोसायटीमध्ये लहानग्यांसाठी खास केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मुलांसाठी कुरकुरीत भेळ आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची सोय करून आनंदाचा माहोल निर्माण करण्यात आला. थोरामोठ्यांनीही मुलांसोबत सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार बनवला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण साळुंके, सचिव विशाल कुंभार आणि खजिनदार अशोक भुजबळ यांनी सर्व उपस्थित सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सांस्कृतिक मंडळातील सागर उनवणे, मुकेश पाटील, धीरज सोनवणे आणि हंसराज देशमुख यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उपक्रमामुळे सोसायटीतील एकोप्याची भावना दृढ झाली असून बालदिनाचा हा सोहळा सर्व रहिवाशांसाठी अविस्मरणीय ठरला.
Editer sunil thorat



