
हडपसर (पुणे) : २६ नोव्हेंबर
जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी भारतीय संविधानातील प्रस्तावना एकत्र वाचून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली.
‘हमारा संविधान–हमारा स्वाभिमान’ कॅम्पेन अंतर्गत संविधान अमृत महोत्सवी जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी मार्गदर्शन करताना संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार–कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी “भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये”, “डॉ. आंबेडकरांचे योगदान” आणि “लोकशाहीतील युवकांची भूमिका” या विषयांवर भाषण, पोस्टर प्रेझेंटेशन व निबंध सादर केले. संविधान जनजागृती रॅली, घटनादुरुस्ती माहिती सादरीकरण आणि शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
जनजागृती अभियानातील उद्दिष्टे, कामकाज आणि यशाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुल संचालक डॉ. व्ही. ए. बुगडे व डॉ. मारुती काळबांडे उपस्थित होते. प्रा. रविराज जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्रा. ए. एम. पाटील, एस. डी. गाडेकर, एन. एस. कोलते, पी. ए. लगदिवे, सी. सी. ममडगे, टी. एस. काशीद तसेच कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी संविधान मूल्ये जीवनात पाळण्याची प्रतिज्ञा केली. प्रा. स्वप्निल गाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्ट्रगीताने समारोप झाला.
Editer sunil thorat





