Loni kalbhor- API देवेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पुणे सोलापूर रोडवर धोकादायक वाहन पार्किंग धारकांवर कडक कारवाई ; राष्ट्रीय महामार्गावर व्यवसाय अन कारवाई… व्हिडिओ पहा..
'आता खबरदार' रोडवर वाहन पार्किंग कराल तर, कारवाईला सामोरे जावे लागणार... Api देवेंद्र पवार वाहतूक शाखा लोणी काळभोर...

पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती, लोणी काळभोर या गावांचे शहरीकरण होत असताना पुणे शहरालगत पूर्व हवेलीत असणाऱ्या या गावांमध्ये दिवसेंदिवस वाढती लोकसंख्येमुळे वाहणांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली असून राष्ट्रीय महामार्गावर पार्किंग करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
देवेंद्र पवार Api वाहतूक शाखा, लोणी काळभोर…
पुणे सोलापूर महामार्गांवर कवडीपाट, काळभोर लाॅन्स चौक, पुढे HP पेट्रोल पंप येथे, लोणी स्टेशन, लोणी काॅर्नर, थेऊर फाटा, सोरतापवाडी या राष्ट्रीय महामार्गच्या दोन्ही बाजूला व सर्विस रोडवर धोकायदायक पद्धतीने वाहन पार्किंग करणाऱ्यात येत असतात. या वाहनावर लोणी काळभोर वाहतूक शाखेचे Api देवेंद्र पवार कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. यापुढील अपघात होणार नाहीत व वाहतूकीस अडथळा होणार नाही यासाठी कडक कारवाई करण्यात येणार
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्याकडेला पार्किंग करणार्या वाहणावर कारवाईचा धडाका…
रस्त्याच्या कडेला होणार्या अवैध प्रवासी वाहतूक व पार्किंगचा धोका लक्षात घेता मोठा अपघात घडू शकतो. अपघाताच्या घटना, नागरिकांचा अपघात हा गंभीर विषय लक्षात घेता पुणे शहर लोणी काळभोर वाहतूक शाखेने नो-पार्किंग मधील वाहणांना दंडात्मक कारवाई चालू केली आहे. स्वता:हा Api देवेंद्र पवार, कर्मचारी, ओव्हाळ, काकडे हे टु व्हिलर, फोर व्हिलर, ट्रक, टॅम्पो, जड वाहनांवर कारवाई करत असल्याचे बोलले जात आहे. या कारवाई मुळे स्थानिक नागरिकांकडून लोणी काळभोर वाहतूक शाखेचे कौतुक केले जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर व्यवसाय..अन..कारवाई पहा व्हिडिओ



