राजकीय

हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर बस स्थानकास भेट, मुलींशी व महिलांशी साधला संवाद! बस स्थानकावर २४ तास महिला पोलीस ठेवण्याची सूचना…

डॉ गजानन टिंगरे / पुणे

पुणे (इंदापूर) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, इंदापूर बस स्थानकास सोमवारी (दि.3) भेट दिली.

यावेळी त्यांनी बस स्थानकामध्ये उपस्थित मुलींशी व महिलांशी संवाद साधला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिवसभर महिला पोलीस ठेवण्याची सूचना केली.

या भेटी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना काही अडचणी आहेत का? अशी विचारणा केली. यावर विद्यार्थिनींनी नाही असे उत्तर दिले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी एका एसटी बस मध्ये जाऊन महिला प्रवाशांशी संवाद साधला. समाजामध्ये स्त्रीला कायमच मानसन्मान व प्रतिष्ठा राहिलेली आहे, स्त्रियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, स्वारगेट बस स्थानकावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेतील अटक केलेल्या आरोपीवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी एस.टी. प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सतत जागृत राहिले पाहिजे. प्रशासनाबरोबर समाजातील सर्वांची, महिला वर्गाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. बस स्थानकावरती पोलीस मदत केंद्र २४ तास सुरू राहणार आहे. पोलीस वर्दीचा वचक व दरारा कायम राहिला पाहिजे. तसेच महिला, मुलींनी त्रास होत असल्यास तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांशी, पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले, आपण राज्य मंत्रिमंडळ असताना ‘ बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर हे बस स्थानक बांधण्यात आले आहे. मध्यमवर्गीय जनतेला प्रवासासाठी एसटी हे एकमेव सुरक्षित साधन आहे. जनतेचे एसटीशी आपुलकीचे नाते निर्माण झालेले आहे. बस स्थानक व परिसराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी सुचना हर्षवर्धन पाटील यांनी केली.

यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, स्थानक प्रमुख संजय वायदंडे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे या अधिकाऱ्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी गाळेधारकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??