राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनचे शानदार संचालन.; अण्णासाहेब मगर विद्यालय
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे निवृत्त कर्नल सुभाष सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सने शानदार संचालन करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
प्रमुख पाहुणे निवृत्त कर्नल सुभाष सावंत यांनी २६ जानेवारी १९४९ रोजी स्वीकारली व २६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची लिहले. जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्य आपला देश ओळखला जातो. असे सांगत त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली येथे संचलनासाठी निवड झाल्याबद्दल कॅडेट एस.यु.ओ. प्रतीक माने, कॅडेट एस.यु.ओ. सूरज थोरात तसेच राज्य प्रजासत्ताक दिनी मुबई येथे संचलनासाठी निवड झाल्याबद्दल ओम थोपटे यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या प्रतिभा अरुण लोणे हीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत घेतलेल्या पुस्तक परीक्षण स्पर्धेत विद्यार्थी गटात सुवर्णा खरे, शिक्षक प्रा. (डॉ.) नाना झगडे व शिक्षकेतर गटात महेंद्र थोरात यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र संचलित करिअर कट्टाचा प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ, कॅप्टन डॉ. धीरज देशमुख, प्रा. काशिनाथ दिवटे, दत्तात्रय बेसके, शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीतम ओवाळ यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.




