क्राईम न्युज

चेष्टेत… भीती दाखवताना ४ वर्षांची मुलगी उकळत्या पाण्याने भाजली ; स्टार सीटीतील या घटनेने हळहळ…वाचा सविस्तर..

पुणे (हवेली) : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील, स्टार सीटी येथे दोन्ही कुटुंब भाडेकरू म्हणून राहत असून  या दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी गोडीगुलाबीने या ठिकाणी वास्तव्य करत आहेत.

पांचाळ यांच्या घराशेजारचा १४ वर्षाचा मुलगा आणि आराध्या हे दोघे खेळत होते. तेव्हा मुलाने आराध्याला उचलून बटाटा उकळत असलेल्या पाण्यात टाकतो, अशी भीती दाखवली. या चेष्टेने घात केला आणि चेष्टा आराध्याच्या जिवावर बेतली. कवडीपाट, स्टार सीटीत धक्कादायक घटना घडली. भीती दाखविण्याच्या नादात ४ वर्षांची चिमुकली उकळल्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना २३ मार्चला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

आराध्या रोहित पांचाळ (वय-४, रा. स्टार सीटी, कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिच्यावर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून ती ४० ते ४५ टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती पांचाळ दांपत्य यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पांचाळ हे कदमवाकवस्ती परिसरात इलेक्ट्रिकलची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून पांचाळ यांना आराध्या नावाची मुलगी आहे. बटाट्याचे वेफर्स बनविण्यासाठी गरम पाणी केले होते. हे उकळलेले पाणी गॅसवरून खाली चालू होते या दरम्यान, पांचाळ यांच्या घराशेजारचा १४ वर्षाचा मुलगा आणि आराध्या हे दोघे खेळत होते. तेव्हा मुलाने आराध्याला उचलून पाण्यात टाकू का अशी भीती दाखवली. त्यानंतर मुलाकडून आराध्या उकळत्या पाण्यात पडल्याची घटना घडली. या घटनेचा आवाज ऐकून आराध्याचे नातेवाईक त्याठिकाणी ताबडतोब आले. त्यांनी आराध्याला गरम पाण्यातून त्वरित बाहेर काढले व उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आराध्यावर उपचार सुरु झाल्यापासून ती बेशुद्ध असवस्थेत होती.

दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी बेशुद्ध असलेली आराध्या शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घराशेजारच्या १४ वर्षांच्या दादाने खेळताना भीती दाखवून पाण्यात टाकतो, असे म्हणाला होता. त्याच्या हातातून सटकून मी पाण्यात पडली, अशी माहिती आराध्याने तिच्या आई-वडिलांना दिली. ही माहिती समजताच आराध्याचे वडील रोहित पांचाळ यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले व घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणात १४ वर्षाच्या मुलाच्या आई वडीलांनी दवाखान्याचा खर्च देण्यास असमर्थता दर्शवली. या घटनेने संपुर्ण उध्वस्त झालेले पांचाळ यांनी अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दोन्ही कुटुंबाला या घटनेची गांभीर्य समजावून सांगितले व माहिती दिली. आपापसात मदत करण्याचे आवाहन केले परंतु मुलाच्या आई, वडील यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पुढील कारवाईसाठी हवालदार केतन धेंडे यांना सुचना दिल्या..

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??