राजकीय

वाल्मिक कराड कोण? शरण आल्यानंतर राजकीय भूकंप, १० मुद्द्यांमध्ये नजर टाकूया? संशयाची सुई..

पुणे : मस्साजोगमध्ये अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाचं कार्यालय आहे. ६ डिसेंबरला शुक्रवारी या कार्यालयात राडा झाला. टाकळीला राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण केली.

यानंतर घुले आणि त्यांच्या साथीदारांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात माजी सरपंच संतोष देशमुख यांनी पवनचक्की कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आणि मध्यस्थी केली. याच गोष्टीचा राग घुलेंच्या डोक्यात होता. त्यातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात आधी विधिमंडळात बीडमध्ये सुरू असलेल्या गुन्ह्यांमागे वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप केला होता. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बीडमधील खंडणी प्रकरण, गुंडशाही, विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेलं बुथ कॅप्चरिंगचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याशिवाय सुरेश धस यांच्यासह अनेक आमदारांनी बीडमध्ये घडलेल्या घटनांवर चिंता व्यक्त केली होता. दरम्यान या सर्वांचा सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. अखेर आज वाल्मिक कराड आज ३१ डिसेंबरला पुणे सीआयडीसमोर शरण गेला आहे.

                  कोण आहे वाल्मिक कराड?

वाल्मिक कराड याच दहावीपर्यंत शिक्षण गावात पूर्ण झालं. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो परळीला गेला.

यादरम्यान परळीतील शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदा भगवान बाबा मंडळ स्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

यानिमित्ताने त्याने परळीत जम बसवला.1990 चा काळ भाजपचा राज्यात माधव पॅटर्न राबवण्यासाठी महत्त्वाचा काळ होता.

या काळात गोपीनाथ मुंडेंच्या हाताखाली राजकारण करायला सुरुवात. गोपीनाथ मुंडे या काळात वंजारी समाजाचे नेते म्हणून उदयास येत होते. मुंडे विधानभवन आणि ग्राऊंड लेव्हलला गाजत होत.

अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित होत होते. यामध्ये वंजारी समाजातून येणारा वाल्मिक कराड हादेखील होता. १९९० सुरुवातील गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते असताना परळीत परमान कॉलनीत भाड्याने राहत होते.

तेव्हा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराडांनी वाल्मिक कराडांना गोपीनाथ मुंडेकडे काम मिळवून दिलं.. मुंडेंचं घरकाम करण्यापासून पडेल. तीकामं वाल्मिक करीत होते.

कराडांनी मुंडेंचा विश्वास संपादन केल्याचं बोललं जातं. गोपीनाथ मुंडेंशी असलेल्या जवळीकतेमुळे कराडासाठी राजकीय दारं उघडली.

वाल्मिक कराड हा परळी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष राहिला आहे. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे.
धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील सर्व कामे वाल्मिक कराडच पाहतो.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे प्रमुख आरोपी आहे, तो वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??