जिल्हाराजकीयसामाजिक

कदमवाकवस्ती येथे २ कोटी ४०.४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन…

आमदार ज्ञानेश्वर माऊली (आबा) कटके यांच्या हस्ते विकासाचा नवा अध्याय सुरू...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कदमवाकवस्ती गावातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एकूण २ कोटी ४० लाख ४० हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या विकासकामांमुळे गावातील रस्ते, साकव, गटार व नागरी सुविधा अधिक सुसज्ज होणार असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमास शिरूर–हवेली मतदारसंघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर माऊली (आबा) कटके प्रमुख उपस्थित होते.

या विकास आराखड्यांतर्गत लोणी स्टेशन–आष्टापूर ते डगरेवस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी ५० लक्ष रुपये, लक्ष्मीनगर येथील ओढ्यावर साकव बांधण्यासाठी ३० लक्ष रुपये, कदमवस्ती ते पांडवदंड रोड (VR-116) साठी ५० लक्ष रुपये, तसेच पालखी तळ ते केदारी वढती टोडवरील ओढ्यावर साकव बांधण्यासाठी ३० लक्ष रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय माळीवाडा ते समर्थ सृष्टी सोसायटी रस्ता – १० लक्ष रुपये, दीपक हाडके घर ते श्रीकांत कुलकर्णी घर बंदिस्त गटारलाईन – १५.१० लक्ष रुपये, त्याच मार्गावरील रस्ता – १५.१० लक्ष रुपये, सोलापूर रोड ते लोणी रेल्वे गटारलाईन – १५.१० लक्ष रुपये आणि सोलापूर रोड ते लोणी रेल्वे स्टेशन रस्ता – १५.१० लक्ष रुपये असा निधीही मंजूर झाला आहे.

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मनपा नियोजन समिती सदस्य प्रविण नाना काळभोर म्हणाले, “अनेक आमदार आम्ही पाहिले; मात्र जमिनीवर पाय ठेवून, कार्यकर्त्यांशी नाते जपणारा आमदार म्हणजे माऊली आबा. सत्तेवर गेल्यानंतरही त्यांनी मैत्री व विश्वासाचे नाते कायम ठेवले आहे. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, हे त्यांच्या कार्यपद्धतीचेच फलित आहे. येणारा काळ कार्यकर्त्यांचा असून तो आबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच विकासाचा ठरेल.”

माजी सरपंच नंदू पाटील काळभोर यांनी सांगितले, “आज कदमवाकवस्तीला मिळालेला अडीच कोटी रुपयांचा निधी हा गावाच्या विकासातील ऐतिहासिक टप्पा आहे. ग्रामपंचायतीने सुचवलेल्या कामांना तातडीने मंजुरी देऊन आमदार आबांनी विकासाला गती दिली. उर्वरित कामांसाठीही आगामी काळात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला आहे. कामांची पारदर्शकता राखण्यासाठी माहिती फलक लावण्याकडेही लक्ष दिले जावे.”

नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “पहिल्याच वर्षात कदमवाकवस्तीकरिता २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर होणे अभिमानाची बाब आहे. पाणीपुरवठा, शिवरस्ते व कचरा व्यवस्थापन हे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होते. या कामांमुळे गावाचा सर्वांगीण विकास होऊन नागरिकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत.”

यावेळी आमदार ज्ञानेश्वर माऊली (आबा) कटके यांनी सांगितले, “सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला जनतेने आमदार करण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामांना सुरुवात करून नागरिकांना दिलासा देणे हा आमचा उद्देश आहे. पाणी, रस्ते व नागरी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

या कार्यक्रमास गणेश थोरात (अध्यक्ष, दलित पँथर – पश्चिम महाराष्ट्र विभाग), निलेश काळभोर (जिल्हा संघटक, शिवसेना – पुणे जिल्हा), दिलीप वाल्हेकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – हवेली तालुका), देविदास अण्णा काळभोर (माजी उपसरपंच), नंदू पाटील काळभोर (माजी सरपंच), ऋषिकेश काळभोर (माजी उपसरपंच), सामाजिक कार्यकर्ते गौरव काळभोर, प्रतीक बाबाराजे काळभोर, मुकुल काळभोर, सुहास काळभोर, सूर्यकांत गवळी, ॲड. अनिता गवळी, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य दीपक आढळे, आकाश धनंजय काळभोर, कोमलताई सुहास काळभोर, अविनाश बडदे, जयश्रीताई उदय काळभोर, सुनंदामाई देविदास काळभोर, अविनाश उर्फ पप्पू बडदे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती) यांच्यासह ग्रामपंचायत माजी सरपंच, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??