
पुणे (हडपसर) : हवेलीतील अप्पर तहसीलदार कार्यालय (लोणी काळभोर) अंतर्गत लोकशाही दिनाचे आयोजन मांजरी बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले.
यावेळी लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, वनश्री लाभशेटावार उपजिल्हाधिकारी भु.स. क्र.६, उपस्थित होते.
जनाधार दिव्यांग संस्थेतील दिव्यांग बांधवांना रोजगार व सेवा म्हणून जनाधार दिव्यांग संस्थेला महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार च्या माध्यमातून दिव्यांगासाठी स्वतंत्र यंत्रणा चालवण्यासाठी मंजुरी मिळावी. यासाठी अप्पर तहसीलदार लोणी काळभोर तृप्ती कोलते पाटील, वनश्री लाभशेटावार उपजिल्हाधिकारी भु.स. क्र.६, याना यावेळी प्रस्ताव देण्यात आला.
प्रसंगी, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, वनविभाग अधिकारी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, अभय पाटील, छाया सिताप, वैशाली ताटे, ओंकार अंकुशे, पृथ्वीराज मस्के, आधी पदाधिकारी उपस्थित होते
दत्तात्रय ननावरे, संस्थापक अध्यक्ष – जनाधार दिव्यांग चारीटेबल ट्रस्ट..
तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १० दिव्यांग बांधवांचे प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांगांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दिव्यांगांना गैरसोय होऊ नये. म्हणून मांजरी बुद्रुक तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्याची सूचना (लोणी काळभोर) अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिल्या.





