राजकीय

ठाकर पक्षाचे माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होताच त्यांच्या विरोधात पुण्यात लागले फ्लेक्स…

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, संगीता ठोसर या पाच माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, भाजप प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

          ठाकरे गटाच्या या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करताच, पुणे शहरातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी पाहण्यास मिळत आहे. तर या पक्ष प्रवेशावरुन भाजपचे पदाधिकारी विशाल दरेकर यांनी नरपतगिरी चौकात एक फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवर ‘पक्ष प्रवेश दुश्मनी जम कर करो, दुश्मनी जम कर करो, लेकीन यह ऐहसास रहे, जब कभ हम दोस्त बन जाये तो शरमिंदा ना हो… श्री. विशाल दरेकर अशा आशयाचे मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सबाजीची शहरातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू रंगली आहे.

          या फ्लेक्सबाजी बाबत विशाल दरेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, प्रवेश केलेल्या पाच माजी नगरसेवकांनी मागील पाच वर्षाच्या कालावधीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केवळ टीका करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आता राज्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर केवळ आपली घरे वाचवण्यासाठी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. आम्ही स्थानिक पातळीवर काम करत असताना अनेकदा विरोधाची भूमिका घेण्यात आली. यांनी पूर्ण केलेली ५ कामे देखील हे सांगू शकत नाहीत, अशी भूमिका मांडत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??