
हडपसर, पुणे : जे एस पी एम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर येथे बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी पालक–शिक्षक सभा आणि इंडक्शन प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ. रवींद्र पाटील, प्राचार्य – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, हडपसर, यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व दीप प्रज्वलनाने झाली. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी संस्थेची शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थी–पालक सहभागाचे महत्त्व आणि येणाऱ्या वर्षातील शैक्षणिक उद्दिष्टांचा आढावा घेतला.
मुख्य मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाच्या संधी, वाढत्या औषधनिर्माण उद्योगातील गरज आणि विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची आवश्यकता यावर भर दिला. त्यांनी पालक–शिक्षकांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात मागील वर्षीचे टॉपर विद्यार्थी तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पालकांनी संस्थेबद्दल समाधान व्यक्त करत मनोगत मांडले.
प्रा. रविराज जाधव यांनी संस्थेच्या सुविधा, शैक्षणिक परंपरा, अभ्यासक्रमाची माहिती आणि आगामी उपक्रमांची रूपरेषा सादर केली. तसेच शिस्त, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर मार्गदर्शनाबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. अनुराधा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन ममडगे, प्रा. तनुजा काशिद, तसेच विवेक थोरात, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, स्वाती माकोणे, रूपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पवार काका, कल्पना सुरवसे आणि आकांक्षा जाधव यांच्या सहकार्याचा समावेश होता.
Editer sunil thorat




