
पुणे : महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा धर्म मानणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्याचा स्मरण ठेवत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आरपीआय मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांबळे, सुरेश राजगे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष किरण जगताप यांच्या हस्ते अभिवादनाची औपचारिकता पार पडली.
या कार्यक्रमाला जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत सकट, सतीश कांबळे, डॉ. तेजस राजगे, अनिल शिंदे, गोपी खेत्रे, शेखर चक्रनारायण, ज्ञानेश्वर मोरे, जेकब डेविड, डेंजिल मेंडोसा, चॅस फर्नांडिस, सादिक शेख, पंढरीनाथ कांबळे, सॅम घंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजहिताच्या कार्यात सातत्य ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
Editer sunil thorat



