फुरसुंगीतील मिसिंग मुलगी जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षित अवस्थेत मिळाली ; मित्रासोबत रजिस्टर विवाह केल्याचा खुलासा…

फुरसुंगी (हडपसर) : फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक 115/25 अन्वये पूजा संतोष जाधव (वय 19) ही 26 सप्टेंबर 2025 रोजी अचानक घरातून निघून गेल्याची नोंद करण्यात आली होती. प्रकरण गांभीर्याचे असल्याने फुरसुंगी पोलीसांनी तपास अधिक गतीने सुरू केला. मुलगी ज्या संशयित तरुणासोबत गेल्याचा अंदाज होता, त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढून लोकेशन तपासले असता ते कथुआ, जम्मू–काश्मीर येथील असल्याचे स्पष्ट झाले.
या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या सूचनेनुसार एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात मुलीची आई उमा जाधव, वडील संतोष जाधव यांच्यासह स. पो. फौ. फडतरे, पो. ह. 6928 पोटे आणि पो.अं. 23 कोरडे यांचा समावेश होता. पथकाने कथुआ येथे पोहोचून स्थानिक पोलिसांची मदत घेतली. कथुआ पोलीस ठाण्याच्या सहकार्याने आणि सीडीआरमध्ये दिसलेल्या मोबाईल टॉवर लोकेशनवर प्रत्यक्ष तपास करून सखोल शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान मिसिंग मुलगी पूजा जाधव अखेर सापडली.
पूजाची चौकशी केली असता तिने पालकांसोबत परत येण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय, जम्मूतील तिचा मित्र विजयसिंह राजपूत याच्यासोबत तिने रजिस्टर विवाह केल्याचे सांगितले. तिने यासंबंधीचे विवाह प्रमाणपत्रही पोलीसांसमोर सादर केले. पूजाने स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतल्याचे पथकाने नोंदवले.
या संपूर्ण घटनेची योग्य ती नोंद स्थानिक कथुआ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील माहिती फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली. दरम्यान, मिसिंग मुलगी सुरक्षित अवस्थेत सापडल्यामुळे पोलीस आणि कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला आहे.
Editer sunil thorat



