जिल्हासामाजिक

लोणी काळभोर पोलीसांची तंबाखू विरोधातील मोठी मोहीम, शतकी कारवाई,२ लाखांचा मुद्देमाल जप्त ; पानटपरी चालकांची बैठक घेऊन कडक सूचना…

लोणी काळभोर (ता. हवेली) : ०८ डिसेंबर २०२५ लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच अवैध सिगारेट विक्रीचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रभावी मोहीम राबवली जात आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यांतर्गत (COTPA Act) तसेच इतर संबंधित कायद्यांच्या आधारे पोलीस स्टेशनच्या पथकांनी वर्षभरात केलेली ही मोहीम यशस्वी ठरली आहे. २०२५ या वर्षात तंबाखूचा अवैध साठा आणि विक्री करणाऱ्यांवर एकूण १०४ कारवाई करून सु. ₹२,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची रणनीती…

या कारवाईचे श्रेय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आखलेल्या काटेकोर योजना आणि अधिकारी–अंमलदारांना दिलेल्या वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शनाला जाते. हजेरीवर घेण्यात येणाऱ्या बैठकीत त्यांनी सतत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकांनी परिसरातील पान टपऱ्या, जनरल स्टोअर्स, किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांवर सतत तपासणी मोहीम राबवली.

आज पानटपरी व तंबाखू विक्रेत्यांची विशेष बैठक…

दिनांक ०८/१२/२०२५ रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन परिसरातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथील पानटपरी आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांची विशेष बैठक घेण्यात आली. यात ४३ व्यावसायिक उपस्थित होते.

या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी व्यवसायासाठी आवश्यक ते अधिकृत परवाने अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, ई-सिगारेट, निकोटीन उत्पादने यांच्या विक्रीवर कडक प्रतिबंध असल्याची आठवण करून दिली. नियमबाह्य विक्री आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबाबत शून्य सहनशीलता धोरण लागू करण्यात येईल, असेही नमूद केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती… 

बैठकीदरम्यान पोलीस स्टेशनकडील स्मिता पाटील (पोलीस निरीक्षक – गुन्हे), कृष्णा बाबर (सहाय्यक पोलीस निरीक्षक), अंकुश बोराटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) हे यावेळी उपस्थित राहिले व व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. बैठकीचा समारोप पोलीस हवालदार रवि आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.

अवैध विक्री रोखण्यासाठी ठोस पावले…

तंबाखूविरोधातील ही मोहीम अधिक बळकट करण्यासाठी पोलिसांनी पानटपऱ्यांची यादी तयार करणे. संशयित दुकानांवर अचानक कारवाई, शाळा–कॉलेज परिसरात विशेष गस्त, आरोग्यविषयक जनजागृती अश्या अनेक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वर्षभरातील शतकी कारवाईचे यश आणि आजची बैठक ही दोन्ही पावले तंबाखूविरोधी लढाईसाठी मोलाची ठरली आहेत. पोलीस दलाच्या कठोर अंमलबजावणीमुळे परिसरातील अवैध तंबाखू विक्रीवर बंधने येणार असून नागरिकांमध्ये आरोग्य-जागरूकता वाढण्यासही मदत होणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??