शिवाजीनगर कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : महाराष्ट्रात प्रथमच ‘कम्युनिटी सर्व्हिस’ची शिक्षा, झोन १ — पोलीस आणि न्यायव्यवस्थेची संयुक्त कडक कारवाई…

पुणे : महाराष्ट्रात पहिल्यांदाच न्यायालयाने गुन्हेगारांना तुरुंगवास अथवा दंडाऐवजी कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा देत नवा पायंडा घातला आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानंतर ही झालेली पहिलीच न्यायालयीन कारवाई असून ती झोन 1 मध्ये पार पडली आहे.
शिवाजीनगर येथील विक्रमसिंह भंडारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, यांच्यासमोर दाखल असलेल्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. शिवाजीनगर पोलीस ठाणे खटला क्रमांक 199017/2025 मधील आरोपी सागर रामकृष्ण बोदडे आणि खटला क्रमांक 199027/2025 मधील आरोपी विनोद वसंत माकोडे या दोघांना भारतीय न्याय संहितेचे कलम 355 अन्वये कठोर स्वरूपाची ४ दिवस, दररोज ३ तासांची सामुदायिक सेवा करण्याचे आदेश देण्यात आले.
ही सेवा शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अंमलदारांच्या देखरेखीखाली पूर्ण करावी, असा स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईच्या सर्व प्रक्रियेवर Sr. PI शिवाजीनगर आणि DCP Zone 1 यांनी थेट लक्ष ठेवून काटेकोरपणे निरीक्षण केले.
या निर्णयामुळे किरकोळ गुन्ह्यांमध्ये सुधारात्मक शिक्षेला प्राधान्य देत न्यायालयाने सकारात्मक बदलाचा मार्ग दाखवला असून, राज्यात अशा शिक्षेच्या स्वरूपाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
Editer sunil thorat



