जिल्हाराजकीयसामाजिक

हडपसरमध्ये रोजगार, आरोग्य व उद्योजकता संधींचा मेळावा, स्मिता तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन…

हडपसर (पुणे) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेत स्मिता तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर परिसरातील दहावी ते पदवीधर युवक-युवतींसाठी हा मेळावा रोजगाराची सुवर्णसंधी ठरणार आहे. 18 ते 45 वयोगटातील सर्व इच्छुक उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे.

या उपक्रमांत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे विशेष आकर्षण असून, नागरिकांना मोफत चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘उद्योजकता मिळावा‘ या कार्यक्रमाअंतर्गत मोफत व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसायासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेचे मार्गदर्शन, विविध सबसिडी योजनांतील अर्ज प्रक्रिया, व्यवसाय निवड मार्गदर्शन तसेच व्यवसाय कर्ज व त्यावरील सबसिडीविषयी माहिती दिली जाणार आहे. स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड शिबिर, संजय गांधी व श्रावणबाळ योजना शिबिर तसेच उत्पन्न दाखला शिबिर आयोजित करण्यात आले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची सोय एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

हा उपक्रम स्मिता तुषार गायकवाड जनसंपर्क कार्यालय, ऑफिस नंबर 6, पंचवटी कॉम्प्लेक्स, वैभव थिएटरजवळ, प्रेम हार्डवेअरच्या शेजारी, महेश बँकेच्या समोर, 111 नंबर बस स्टॉपच्या मागे, हडपसर गाव येथे पार पडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक स्मित सेवा फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??