जिल्हाराजकीयसामाजिक

हडपसर रेल्वे स्थानकावरून काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेचे जयघोषात भव्य प्रस्थान…

भाविकांच्या आशेचा ‘साकोरेंचा किरण’; महिलांचा भावस्पर्शी संदेश – “भगवंता! आमच्या किरणची स्वप्ने पूर्ण कर!”...

हडपसर (ता. हवेली) : दि. १३ नोव्हेंबर लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण पै. किरण साकोरे यांनी भक्तीसेवा, आयोजनकौशल्य आणि लोकसहभागाची अनोखी सांगड घालत काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभु श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांना एकत्र आणले. या उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता आज हडपसर रेल्वे स्थानकावरून दुसरी देवदर्शन रेल्वे अत्यंत दिमाखात, भक्तिमय वातावरणात रवाना झाली.

रेल्वे स्थानक परिसरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. भगवा झेंडे, जयघोष, टाळमृदंगाच्या नादात संपूर्ण स्टेशन ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात दुमदुमून निघाले.

महिलांची भावस्पर्शी प्रार्थना — “किरणची स्वप्ने पूर्ण कर, भगवंता!”

यात्रेसाठी आलेल्या महिलांनी एक विशेष भावना व्यक्त केली. गंध, ओवाळणी आणि टाळांच्या नादात त्यांनी एकमुखाने प्रार्थना केली. “भगवंता! या गटाच्या विकासासाठी झटणाऱ्या आमच्या किरणची स्वप्ने पूर्ण कर. त्याचा मार्ग उजळ कर.” त्यांचे अश्रू भरलेले ओझरते डोळे आणि प्रामाणिक भावनेने भरलेले स्वर स्थानकातील उपस्थितांना चटका लावून गेले. या क्षणाने संपूर्ण वातावरण अधिक आध्यात्मिक बनले.

मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती – भक्तिभावात मिसळले नेतृत्व…

यात्रेच्या प्रस्थानावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर भाविकांसोबत सहभागी झाले.

यावेळी मान्यवर उपस्थित होते

— पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद

— माजी सरपंच श्रीकांत कंद
— लोकनियुक्त सरपंच मंदाकिनी साकोरे
— माजी उपसरपंच सोहम शिंदे
— भाजपचे भाऊसाहेब झुरुंगे, गौरव झुरुंगे, निलेश कंद, तसेच विविध गावांचे सरपंच–उपसरपंच, आजी–माजी सदस्य मान्यवरांनी यात्रेसाठी केलेल्या व्यवस्थापनाचे कौतुक करत भाविकांना शुभेच्छा दिल्या.

उपक्रमाला मानाचा मुजरा – माजी सरपंचांचे कौतुक…

लोणीकंदच्या माजी सरपंच मोनाली कंद आणि माजी सरपंच लीना कंद यांनी पै. किरण साकोरे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले—“जनतेच्या सेवेसाठी धडपडणाऱ्या किरण साकोरे यांना मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळत आहे. जनतेची राजकीय स्वप्ने ते पूर्णत्वास नेतील, याबद्दल आम्हाला खात्री आहे.”

दुसऱ्या यात्रेचे भव्य प्रस्थान – जयघोषांनी दुमदुमले हडपसर स्टेशन…

प्रदिपदादा कंद युवा मंच’ आणि ‘पै. किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरी काशी–अयोध्या देवदर्शन यात्रा रेल्वे रात्री १० वाजता हडपसर रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. स्थानक परिसर भगवा पताका, हार, फटाक्यांच्या रोषणाईने उजळून गेला होता. प्रवासी डब्यांतूनही जयघोषांचे निनाद ऐकू येत होते.

भक्तिमय गाण्यांनी आणि अभंगांनी भारावले वातावरण…

लोणीकंदच्या माजी सरपंच लीना कंद आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कैलास कंद यांच्या पुढाकाराने “गाडी चालली वळणावरी ग… त्याचा ड्रायव्हर राम कृष्ण हरी…” या खास भक्तीगीतावर सर्व भाविक स्वयमेव थिरकले. काही महिला भक्तींनी टाळांच्या तालावर गवळणी, अभंग म्हणत वातावरणात भक्तिमयतेची लकेरच उमटवली. वृद्ध–तरुण, महिला–पुरुष सर्वांच्या डोळ्यात समाधानाची चमक होती.

“यात्रा म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा सुंदर उत्सव” — पै. किरण साकोरे…

यात्रेच्या प्रस्थानानंतर पै. किरण साकोरे म्हणाले— “हे माझ्यासाठी एक स्वप्नवत क्षण आहे. काशी विश्वेश्वर आणि प्रभू श्रीरामांच्या कृपेने लोणीकंद–पेरणे गटात विकासाची गंगा आणणे हे माझे ध्येय आहे. ही यात्रा केवळ देवदर्शन नाही, तर सामाजिक एकतेचा, प्रेमाचा आणि भक्तीचा सुंदर सेतू आहे.” ते पुढे म्हणाले— “मायबाप जनतेच्या आशिर्वादाने भविष्यातही अशा सेवा–उपक्रमांचे व्रत सुरू ठेवणार आहे.”

यात्रेचे वैशिष्ट्य – लोकसहभागाचा उत्तुंग नमुना…

यात्रेच्या व्यवस्थापनासाठी प्रदिपदादा कंद युवा मंच आणि किरण साकोरे मित्र परिवारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित दूरदूरच्या गावांमधून आलेल्या यात्रेकरूंनी याला “जीवनातील अविस्मरणीय क्षण” म्हटले जय श्रीराम, हर हर महादेवच्या घोषात हडपसर स्टेशनचा एकही कोपरा न राहता परिसर गुंजून गेला.

भाविकांच्या आशीर्वादात रेल्वे प्रस्थान…

हजारो भाविकांच्या आशिर्वादाने, भक्तीभावाने सजलेल्या भाविकांनी भरलेली रेल्वे हळूहळू पुढे सरकताच घोष पुन्हा एकदा जोरात उमटला— “जय श्रीराम!” “हर हर महादेव!” प्रदिपदादा कंद युवा मंच आणि पै. किरण साकोरे मित्र परिवाराच्या संयोजनात आयोजित ही यात्रा खरोखरच श्रद्धा, सेवा आणि लोकसहभाग यांचे विलक्षण मिश्रण ठरली. 

Edited sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??