
हडपसर, (पुणे) : | दि. १२ डिसेंबर २०२५ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी महाविद्यालयात विविध उपक्रमांनी आजचा दिवस उत्साहपूर्ण झाला. प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसाभर वेगवेगळ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, निबंध लेखन, वक्तृत्व आणि काव्यलेखन स्पर्धा, मुलाखत व डॉक्युमेंटरी निर्मिती तसेच मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. पवार साहेबांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात प्रतीकात्मक ८५ वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही उपक्रममाला विद्यार्थ्यांनी उत्साहाने पार पाडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास कांबळे यांनी केले. डॉ. ज्योती किरवे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. राधाकिसन मुठे यांनी आभारप्रदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे, IQAC समन्वयक प्रा. संजय अहिवळे, उपप्राचार्य प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. सोपान आयनार, डॉ. रंजना जाधव, डॉ. मृणालिनी आहेर, डॉ. छाया सकटे, डॉ. शुभांगी वासके, ग्रंथपाल शोभा कोरडे, प्रा. किसन पठाडे, प्रा. दत्ता वासावे, ऑफिस प्रमुख शेखर परदेशी तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीची जाण दाखवली. महाविद्यालयातील हा प्रेरणादायी उपक्रम दिवसाभर चर्चेचा विषय ठरला..
Editer sunil thorat




