
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवालय चर्चमध्ये गुरुवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना ख्रिस्ती बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी विशेष प्रार्थना सभेने झाली. त्यानंतर धन्यवादी आराधना, पवित्र सहभागांतर्गत संगीत महाविधी, सामूहिक मेळावा तसेच विविध मनोरंजक व धार्मिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉद्वारे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत शांतता, ऐक्य, बंधुता आणि प्रेमाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात सलोखा व सामाजिक एकोपा वृद्धिंगत होण्यास हातभार लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी रेव्ह. अशोक कॅरप, रेव्ह. जे. एम. गायकवाड, रेव्ह. जयप्रकाश आढाव, सचिव मनोज येवलेकर, खजिनदार प्रशांत सूर्यवंशी, सदस्य गिरीश पाठक, दिलीप शेकटकर, विकास उमापती, रोजमेरी साठे, विजया इंदुरकर, प्राजक्ता परोळ, कौमुदी येवलेकर, किरण बारसे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी चर्च समिती व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
Editer sunil thorat



