जिल्हासामाजिक

महाराष्ट्र कारागृह अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा २० वा वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न…

पुणे : (दि. ३१ डिसेंबर) महाराष्ट्र कारागृह अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेचा २० वा वर्धापन दिन तसेच सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेणारा हा सोहळा सभासदांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती पल्लवी कदम, अतिरिक्त अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते पतसंस्थेचे संस्थापक स्व. माधवराव कर्वे (माजी पोलीस महानिरीक्षक – तुरुंग) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव भरत बंडगर यांनी संस्थेचा सविस्तर वार्षिक अहवाल सादर केला. अहवालातून संस्थेची आर्थिक स्थिती, सभासद संख्या, ठेवी व कर्ज वितरण, सामाजिक उपक्रम तसेच भविष्यातील योजनांची माहिती सभासदांना देण्यात आली. संस्थेने अल्प कालावधीत केलेली प्रगती व सभासदांना दिलेले विश्वासार्ह सेवा कार्य याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यानंतर संस्थेचे चेअरमन मनोज गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीत माजी पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात पतसंस्था अधिक सक्षम, पारदर्शक व सभासदाभिमुख करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख अतिथी श्रीमती पल्लवी कदम यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पतसंस्था मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेने सभासदांचा विश्वास जपत उत्तरोत्तर प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्व पदाधिकारी व सभासदांना शुभेच्छा दिल्या.

यानंतर सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त केक कापून उपस्थितांनी आनंद साजरा केला. या प्रसंगी सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमास श्रीमती मयुरी तुवर (तुरुंगाधिकारी), संस्थेचे व्हा. चेअरमन अतुल पटेकर, सहसचिव योगेश पाटील, संचालक प्रमोद इंगळे, प्रमोद जाणराव, दौलत खिलारे, साहेबराव वाळकुले, संचालिका प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ, संस्थेच्या लिपिक प्रिया शिर्के, स्वाती बडेकर यांच्यासह राज्यभरातील मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सोनवणे यांनी प्रभावीपणे केले, तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश पवार यांनी विशेष सहकार्य केले. हा वर्धापन दिन सोहळा संस्थेच्या एकजुटीचे, यशस्वी कार्याचे आणि भविष्यातील प्रगतीच्या संकल्पाचे प्रतीक ठरला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??