जिल्हाराजकीयसामाजिक

भाजपचा प्रभाग १६ मध्ये धक्का ; स्मिता गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने राजकीय वादळाची शक्यता…

हडपसर (पुणे) : पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमधील तिकीट वाटपाचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना, हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपने घेतलेल्या निर्णयामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. सामाजिक क्षेत्रात जवळपास १२ वर्षे एक तप कार्यरत असलेल्या, जनसंपर्क आणि सक्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षांतर्गत तसेच स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भाजपने प्रभाग क्रमांक १६ मधून दोन उमेदवारांना थेट ए व बी फॉर्म देत उमेदवारी निश्चित केली असून, त्यामुळे या प्रभागातील भाजपची दिशा स्पष्ट झाली आहे. मात्र या निर्णयात स्मिता गायकवाड यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, नागरी आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या गायकवाड यांना डावलल्याने ‘कार्यकर्त्यांना डावलून वशिलाबाजीला प्राधान्य?’ असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.

स्मिता गायकवाड यांनी गेल्या १२ वर्षांत प्रभागातील पाणी, रस्ते, आरोग्य, महिला प्रश्न, दिव्यांगांचे हक्क तसेच सामान्य नागरिकांच्या तक्रारींसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्या केवळ पक्षाच्या नव्हे, तर लोकांच्या उमेदवार म्हणून ओळखल्या जात होत्या. अशा परिस्थितीत भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने प्रभाग १६ मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, याचे पडसाद येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, स्मिता गायकवाड आता भाजपला रामराम ठोकणार का? याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्या कोणता पर्याय निवडणार, स्वतंत्र लढणार की अन्य पक्षाचा झेंडा हाती घेणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, हेही तितकेच स्पष्ट आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या तिकीट कोंडीच्या पार्श्वभूमीवर आधीच अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यातच हडपसरातील प्रभाग १६ मध्ये स्मिता गायकवाड यांच्यासारख्या मजबूत सामाजिक चेहऱ्याला डावलल्याने भाजपसमोर नवे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. आता प्रश्न एकच आहे— स्मिता गायकवाड यांचा पुढचा राजकीय डाव काय असणार? तो निर्णय भाजपसाठी धक्कादायक ठरणार की प्रभाग १६ मधील लढत अधिक चुरशीची करणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, प्रभाग क्रमांक १६ मधील राजकारण आता ढवळून निघणार, यात शंका नाही.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??