
हडपसर (पुणे) : प्रभाग क्रमांक १६ मध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून स्मिता तुषार गायकवाड यांनी तिकिट जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडत थेट मैदानात उडी घेतली आहे. या धडाकेबाज सुरुवातीमुळे विरोधकांची राजकीय गणिते कोलमडली असून ते अक्षरशः बिथरले आहेत.
कार्यालयापासून पायी चालत हडपसर मंडई येथील श्री गणेश व शारदा माता मंदिरात दर्शन व आरती करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. जनतेशी थेट संवाद साधत, कोणतीही दिखाऊ शक्तीप्रदर्शन न करता केलेल्या या प्रचाराने खरे नेतृत्व कोणाचे आहे हे स्पष्ट झाले, अशी चर्चा प्रभागात रंगली आहे.
विरोधकांकडे घोषणा, गायकवाडांकडे काम…
स्मिता गायकवाड यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. वर्षानुवर्षे केवळ आश्वासनांची पोकळी निर्माण करणारे विरोधक आज लोकांपासून दूर, प्रचारात मागे आणि संभ्रमात अडकलेले दिसत आहेत. “स्मिता गायकवाड यांनी काम करून दाखवले आहे, विरोधकांनी फक्त बोलून दाखवले,” अशी खणखणीत प्रतिक्रिया नागरिक उघडपणे देत आहेत.
जनतेचा कौल स्पष्ट; विरोधकांचा पराभव अटळ…
सामाजिक, महिला सक्षमीकरण आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या स्मिता गायकवाड यांना जनता आता स्पष्ट कौल देण्याच्या मनस्थितीत आहे. “अभी नही तो कभी नही” या भावनेतून नागरिक स्मिता गायकवाड यांना एकतर्फी विजयी करण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे.
प्रचारात आघाडी ; विरोधक हतबल…
स्मिता गायकवाड यांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहता विरोधकांची हवा निघाली आहे. अंतर्गत गटबाजी वाढली असून निवडणुकीआधीच विरोधकांना पराभवाची चाहूल लागली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, “प्रचाराची ही आक्रमक आणि नियोजनबद्ध सुरुवात म्हणजे विजयावर शिक्कामोर्तबच आहे.” प्रभाग १६ मध्ये सध्या एकच चर्चा आहे.
काम करणारी उमेदवार की पोकळ आश्वासनांचे राजकारण? यातील फरक पाहता जनतेच्या मनातील उत्तर स्पष्टपणे स्मिता तुषार गायकवाड यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.
Editer sunil thorat





