बारामतीत एआय क्रांतीचा श्रीगणेशा ; पवार–अदानी यांच्या हस्ते ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे भव्य उद्घाटन…

बारामती (पुणे) : शरदचंद्र पवार आणि उद्योगपती गौतमजी अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ चे दिमाखदार उद्घाटन झाले. या ऐतिहासिक समारंभाला प्रीतिभाभी अदानी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, प्रताप पवार, राजेंद्र पवार, नगराध्यक्ष सचिन सातव, ॲड. अशोक प्रभुणे, नीलिमा गुजर, युगेंद्र पवार, शिर्के कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या कॉपीराइट ड्राइव्हमध्ये ३०० हून अधिक कॉपीराइट नोंदवण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
“आजचा दिवस केवळ उद्घाटनाचा नाही, तर बारामतीसाठी नव्या युगाची सुरुवात आहे,” असे सांगत शरद पवार यांनी एआयमुळे जग बदलत असताना बारामतीत त्यांच्या नावाने हा वेगळा उपक्रम उभा राहत असल्याचे अधोरेखित केले. या केंद्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक केले.
पवार–अदानी कुटुंबांतील ३० वर्षांहून अधिक काळाचे जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित करत अदानीजींच्या जागतिक यशामागील संघर्ष व प्रीतिभाभींच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. लोकसभेतील ‘चॅट जीपीटी’चा अनुभव सांगताना, कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची असली तरी माणसाची जागा घेऊ शकत नाही, संस्कार, नात्यांतील ओलावा व भावनिक बंध एआयकडून शक्य नसल्याचे ठामपणे सांगितले.
भारतामध्ये पुढील पाच वर्षांत अदानींच्या सीएसआर फंडातून रुग्णालयांमध्ये सर्वाधिक बेड उपलब्ध होतील, अशी माहिती देत विद्या प्रतिष्ठान बारामती, विद्यानगरी भिगवण, बारामती आणि अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्री यांच्यात सामंजस्य करार झाल्याची घोषणा करण्यात आली. संशोधन-विकास, फॅकल्टी व विद्यार्थी प्रशिक्षण, प्लेसमेंट-इंटर्नशिप, उद्योगाभिमुख प्रकल्प, स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप प्रोत्साहन या क्षेत्रांत एकत्रित काम केले जाणार असून दरवर्षी आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
१९७२ साली स्थापन झालेल्या विद्या प्रतिष्ठानच्या उभारणीत बारामतीकरांचे प्रेम व विश्वास निर्णायक ठरल्याचे सांगत देशपांडे, गुजर, शहा, उंडे, जाधव, छाजेड कुटुंबांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. केंद्राच्या उभारणीत प्रतापराव पवार यांचे योगदान, तसेच राजेंद्र पवार व निलेश नलावडे यांच्या सहकार्याने केव्हीकेमध्ये एआयवरील काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
यासाठी ऑक्सफर्ड, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडिया, हार्वर्ड, वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठ आणि गेट्स फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत असल्याचेही सांगण्यात आले. समारोपात, अदानी दांपत्याने दरवर्षी बारामतीत येऊन देशाला एक चांगले कार्य अर्पण करावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
Editer sunil thorat









