
डॉ. गजानन टिंगरे
जंक्शन (ता. इंदापूर) : लासुर्णे व परिसरातील नागरिकांनी ज्या विश्वासाने मतदान केले, त्या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देण्याची आमची ठाम बांधिलकी आहे, असा स्पष्ट संदेश देत लासुर्णे येथे ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मा. श्रीराज (भैय्या) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या वेळी लासुर्णे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लासुर्णे परिसरातील रस्त्यांची अवस्था, दळणवळणातील अडचणी आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून ही कामे हाती घेण्यात आली होती. भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन (भाऊ) वाकसे यांनी या सर्व कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत निधी मंजूर झाला आणि ठरलेल्या कालावधीत ही सर्व कामे पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाली. या विकासनिधीस कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यातून मान्यता मिळाली आहे.
या लोकार्पण सोहळ्यात एकूण चार महत्त्वाच्या रस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. लासुर्णे शिवकृपा हॉटेल ते वीज वितरण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे २५ लाख रुपयांत काँक्रीटीकरण, लासुर्णे इंदापूर–बारामती रोड ते पाटील वस्ती रस्त्यासाठी १० लाख, जंक्शन लोदाडे वस्ती अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख, तसेच कळस जंक्शन रोड ते खर्जुल वस्ती रस्त्यासाठी १५ लाख रुपये खर्चून कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या रस्त्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन प्रवास सुलभ होणार असून शेतीमाल वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास आणि आपत्कालीन सेवांसाठी मोठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमास आमोल पाटील, सागर पाटील, उल्हास जाचक, संतोष लोंढे, नेताजी लोंढे, वैभव लोंढे, पांडुरंग सुळ, तुकाराम वाडकर, सचिन लोदाडे, रोहित लोदाडे, रणजित पांढरे, रोहन पांढरे, अमर नरूटे, रणजित खर्जुल, प्रज्वल खर्जुल, विकास टकले, सहदेव सरगर, सचिन सोलनकर, सोनू बोरकर, शेखलाल घोरपडे, हणमंत निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात सामाजिक सलोखा आणि आपुलकी जपत बंटी लोदाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, गजानन वाकसे यांच्या प्रयत्नातून आणि कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यातून सन २०२४–२५ या कालावधीत लासुर्णे परिसरात जवळपास १ कोटी रुपयांहून अधिक विकासनिधी उपलब्ध झाला आहे. रस्ते, मूलभूत सुविधा आणि स्थानिक गरजांवर लक्ष केंद्रित करत विकासकामांची ही मालिका पुढे ही सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकांच्या विश्वासातून मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा हा प्रयत्न असून, लासुर्णे व परिसराचा सर्वांगीण विकास हाच खरा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Editer sunil thorat





