
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व वार्ड क्रमांक १ मधील विद्यमान सदस्य आकाश धनंजय काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अत्यंत भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हा कार्यक्रम वार्ड क्रमांक १ मधील कवडीपाट परिसरात, गोल्डन सियारा स्कूलच्या समोरील बाजूस आयोजित करण्यात आला होता.
रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ९ वाजता आयोजित या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार राहुल कुल, नव परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड तसेच लोकनियुक्त माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाश काळभोर यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
या प्रसंगी आकाश काळभोर यांच्या आई-वडिलांच्या हस्ते केक भरून वाढदिवस साजरा करण्यात आला, तर पत्नी यांनीही केक भरून अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या, त्यामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक व भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
यानंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील आकाश धनंजय काळभोर जनसंपर्क कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे व विकासकामांसाठी प्रभावी पाठपुरावा करणे, असा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भव्य कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, पोलीस अधिकारी, डॉक्टर, व्यावसायिक, उद्योजक, तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, दोन्ही ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी आकाश काळभोर यांच्या सामाजिक बांधिलकीचे व लोकहिताच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साही व लोकसहभागातून यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आकाश काळभोर मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
Editer sunil thorat







