जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

तलाठी निलंबन व तात्काळ भरपाईची मागणी ; २६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा…कदमवाकवस्ती…

कदमवाकवस्तीतील अतिवृष्टीचे ६७ पंचनामे नामंजूर ; तलाठींच्या हलगर्जीपणामुळे नुकसानग्रस्तांवर अन्याय...

कदमवाकवस्ती (ता. हवेली, जि. पुणे) : दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे कदमवाकवस्ती परिसरातील घोरपडेवस्ती, इंदिरानगर, कवडीगाव, वाकवस्ती व माळवाडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने कपडे, धान्य, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली होती. या नुकसानीचे पंचनामे शासन निर्देशानुसार ग्रामसेवक, तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी केले होते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे पूर्ण करून ते शासन दरबारी सादर करण्यात आले होते.

दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने पंचनाम्यांची सविस्तर यादी अप्पर तहसीलदार, लोणी काळभोर यांच्याकडे पाठवली होती. मात्र अंतिम यादीत अनेक प्रत्यक्ष नुकसानग्रस्त कुटुंबांची नावे वगळण्यात आल्याचे समोर आले. यामध्ये वार्ड क्रमांक २ मधील ४७ व वार्ड क्रमांक ६ मधील २०, असे एकूण ६७ पंचनामे नामंजूर करण्यात आले असून संबंधित कुटुंबांना आजतागायत कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

याबाबत ग्रामपंचायत सदस्या व उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी तलाठींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीकडून पंचनाम्यांची यादी वेळेत तलाठींकडे देण्यात आली होती. मात्र तलाठींच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे ही यादी पुढील प्रशासनाकडे वेळेत पाठवली गेली नाही. याचा थेट फटका गरीब व गरजू नुकसानग्रस्त कुटुंबांना बसला आहे.”

या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी पुणे, अप्पर तहसीलदार लोणी काळभोर व मंडल अधिकारी लोणी काळभोर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. राहिलेले पंचनामे तात्काळ स्वीकारून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, अन्यथा अप्पर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी राजश्री काळभोर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बेजबाबदार तलाठींचे तात्काळ निलंबन करून नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी. अन्यथा दि. २६ जानेवारी रोजी कदमवाकवस्ती येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.”

दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. या घटनेमुळे कदमवाकवस्ती परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून, “अतिवृष्टीग्रस्तांना न्याय कधी मिळणार?” “दोषी तलाठीवर कारवाई होणार का?” असे सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??