क्राईम न्युजजिल्हासामाजिक

लोणी काळभोर पोलिसांकडून अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन…

लोणी काळभोर हद्दीत आढळलेल्या अज्ञात मृत पुरुषाची ओळख पटेना ; पोलिसांचा नागरिकांना साद...

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे नोंद असलेल्या अ. म. रजि. क्रमांक ०३/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे एका अज्ञात मृत पुरुष इसमाबाबत तपास सुरू असून, सदर मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सदर मृत इसमाचे अंदाजे वय सुमारे ४० वर्षे असून त्याची उंची अंदाजे १६८ सेंटीमीटर आहे. रंग निमगोरा असून शरीरयष्टी मजबूत आहे. मृत इसमाच्या कपाळाच्या वरच्या भागातील तसेच डोक्यावरील सर्व केस गळून गेलेले असून टक्कल पडलेले आहे. चेहऱ्याची ठेवण सामान्य असून नाक सरळ आहे.

मृत इसमाच्या अंगावरील कपड्यांमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट असून त्यावर पांढऱ्या रंगाचे उभे पट्टे (लाईनिंग) आहेत. खाली पांढऱ्या रंगाची पँट असून आत राखाडी रंगाची जॉकी कंपनीची अंडरवेअर परिधान केलेली आढळून आली आहे. मृत इसमाच्या शरीरावर ओळख पटविण्यास उपयुक्त अशी गोंदण (टॅटू) चिन्हे देखील आढळून आली आहेत. त्याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजी भाषेत “Ankita Rocks” असे गोंदण असून त्यापुढे प्रेमाचे (लव्ह) चिन्ह आहे. त्याखाली इंग्रजीमध्ये “Anki” असे लिहिलेले असून त्याखाली रोमन अंकामध्ये “XII II XCII” असे गोंदलेले आहे. तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजीमध्ये “d B” असे लिहिलेले असून त्याच्या बाजूला “10/06/2021” ही तारीख गोंदलेली आहे.
सदर मृत पुरुष इसमाबाबत कोणासही माहिती असल्यास किंवा या वर्णनाशी जुळणारी व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास, तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईक असल्यास त्यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव व मोबाईल क्रमांक पूर्णतः गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर या ठिकाणी संपर्क क्रमांक ८९९९५४०७२८ वर संपर्क साधावा. तसेच ई-मेलद्वारे माहिती देण्यासाठी pilonikalbhor@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्याशी थेट ९८२३३७३८४८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??