जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गृह मंत्रालयाचा इशारा ; सायबर ठगांची नवी युक्ती, फोनमधील ‘ही’ सेटिंग त्वरित बदला, अन्यथा खातं होऊ शकतं रिकामं!

नवी दिल्ली : देशात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना सायबर ठगांनी आता फेक लिंक किंवा बनावट अ‍ॅप्सऐवजी मोबाईलमधील एका सर्वसामान्य फीचरचा गैरवापर सुरू केला आहे. या नव्या प्रकाराला कॉल फॉरवर्डिंग स्कॅम असे म्हटले जाते. या स्कॅममुळे बँक खाते, सोशल मीडिया अकाउंट्स आणि वैयक्तिक माहिती गंभीर धोक्यात येऊ शकते.

या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) ने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.

कॉल फॉरवर्डिंग हे मोबाईलमधील एक सामान्य फीचर असून, येणारे कॉल दुसऱ्या नंबरवर वळवता येतात. मात्र, सायबर ठग याच फीचरचा वापर करून युजर्सचे कॉल आणि OTP स्वतःकडे वळवत आहेत. ठग स्वतःला कुरिअर कंपनी, डिलिव्हरी एजंट किंवा सर्व्हिस प्रतिनिधी म्हणून ओळख करून देतात. पार्सल अडकल्याचे किंवा माहिती अपडेट करण्याचे कारण देत ते युजर्सना विशिष्ट USSD कोड डायल करण्यास सांगतात.

हे USSD कोड बहुतेक वेळा 21, 61 किंवा 67 या आकड्यांनी सुरू होतात. युजरने हा कोड डायल करताच त्याच्या फोनमधील कॉल फॉरवर्डिंग सक्रिय होते आणि बँकेकडून येणारे OTP, व्हेरिफिकेशन कॉल्स व अलर्ट थेट सायबर ठगांच्या फोनवर जातात. त्यानंतर बँक खात्यातील पैसे काढणे, WhatsApp किंवा इतर सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करणे असे प्रकार घडतात.

I4C ने स्पष्ट केले आहे की, या स्कॅममध्ये कोणतीही लिंक क्लिक करावी लागत नाही किंवा अ‍ॅप डाउनलोड करावे लागत नाही, ही बाब अधिक धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी कॉल्स, SMS आणि USSD कोडबाबत विशेष सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग चुकीने सुरू झाल्याची शंका असल्यास तात्काळ ##002# हा कोड डायल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा कोड डायल केल्यास सर्व प्रकारची कॉल फॉरवर्डिंग बंद होऊन कॉल पुन्हा थेट युजर्सच्या फोनवर येऊ लागतात.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??