जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना ५ टक्के निधीतून लाभवाटप ; पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरण्याचा मान…

दिव्यांगांसाठी ५% निधीचा थेट वापर ; कदमवाकवस्ती ग्रामपंचायत पुणे जिल्ह्यात पहिली!

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत उत्पन्नातील ५ टक्के निधीची प्रभावी अंमलबजावणी करत थेट लाभवाटप करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले आहे. या उपक्रमाअंतर्गत एकूण ७३ दिव्यांगांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्ष ५५ दिव्यांग बांधवांना सुमारे २४ लाख रुपयांचा थेट लाभ देण्यात आला. त्यामुळे दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी प्रत्यक्ष वितरित करणारी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर ठरली आहे.

 

चालू वर्षात नावनोंदणी झाल्यामुळे उर्वरित दिव्यांग बांधवांना सध्या लाभ मिळू शकला नसला, तरी पुढील टप्प्यात त्यांनाही लाभ देण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांचा नव परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिला अध्यक्षा व महा संपर्क प्रमुख सुरेखा ढवळे यांच सन्मान माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी शेखर शेलार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना अधिक गतिमानपणे अंमलात आणण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायती पूर्ण सहकार्य करतील. दिव्यांगांना विविध लाभ मिळण्यासाठी यूडीआयडी कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून, सर्व दिव्यांगांचे यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. संविधानिक व कायदेशीर तरतुदीनुसार किमान ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

नव परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा आढावा घेताना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कदमवाकवस्तीतील गोरगरीब नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. २०१७ नंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, पुढील काळात मदतीचा आकडा अधिक वाढेल आणि त्याचा थेट लाभ दिव्यांग बांधवांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिव्यांगांच्या शासकीय व अशासकीय कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिला अध्यक्षा व महा संपर्क प्रमुख सुरेखा ढवळे यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांग निधीच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर ठरल्याचे सांगितले. दिव्यांगांना घरकुल, नोंदी व इतर शासकीय लाभ देताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, अन्यथा संघटना आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी सरपंच व विद्यमान सदस्य नंदू पाटील काळभोर यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही कामात ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल. मागील कार्यकाळात वस्तू स्वरूपात मदत देण्यात येत होती; मात्र स्वरूप बदलल्याने आता निधीच्या माध्यमातून थेट लाभ देण्यात येत असून, २०१७ साली झालेल्या सर्वेक्षणानंतर ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हवेली तालुका अध्यक्ष नितीन पकाले यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांसाठी घरकुल, विविध निधी व योजनांसाठी ग्रामपंचायतींनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पुणे जिल्हा प्रहार संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे, नव परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच नंदू पाटील काळभोर, माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच नासीरखान पठाण, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, सिमिता लोंढे, कोमल काळभोर, बिना काळभोर, मंदाकिनी नामगुडे, राजेश्री काळभोर, दिपक आढाळे, सुनंदा काळभोर, रूपाली काळभोर, स्वप्नेश कदम, अविनाश बडदे, सोनाबाई शिंदे, योगेश मिसाळ, सलिमा पठाण, राणी गायकवाड यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे, सामाजिक कार्यकर्ते सुहास काळभोर, दिपक काळभोर, ज्येष्ठ नागरिक व कदमवाकवस्ती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीतून २४ लाख रुपयाचे थेट वितरित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आदर्श कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने निर्माण केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??