वाहतूक विभागातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; PSI लक्ष्मण नवगणे यांचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार…

पुणे : पुणे शहर वाहतूक विभागात उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक (PSI) लक्ष्मण नवगणे यांचा माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सध्या पुणे शहर वाहतूक विभागात PSI म्हणून नेमणुकीस असलेल्या नवगणे यांनी वाहतूक शिस्त, नियोजन आणि नागरिकाभिमुख कामकाजात ठोस योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस दलाचा २ जानेवारी स्थापना दिवस सप्ताह स्वरूपात साजरा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने परिमंडळ ६ अंतर्गत मुद्देमाल वितरण समारंभ गुरुवारी (८ जानेवारी) विमाननगर येथील सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनलच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते परत करण्यात आला.
याच कार्यक्रमात PSI लक्ष्मण नवगणे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त हेमंत जाधव, निखील पिंगळे, सोमई मुंडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
PSI लक्ष्मण नवगणे यांच्या या सन्मानामुळे वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Editer sunil thorat




