लोणी काळभोर येथे रामदरा रोड नवीन कॅनॉल पुलाचे लोकार्पण व सुमारे ३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर येथील रामदरा रोडवरील नवीन कॅनॉल पुलाचे लोकार्पण तसेच जिल्हा नियोजन निधी, जनसुविधा निधी व ग्रामनिधीअंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवार, दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनिषाताई ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या लोकार्पण व भूमिपूजन समारंभास प्रशांतदादा काळभोर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), सिताराम लांडगे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ), प्रताप शं. बोरकर (माजी चेअरमन, सहन सहकारी बँक), आण्णासाहेब ग. काळभोर (माजी उपसरपंच), विठ्ठल रामचंद्र काळभोर, ज्ञानेश्वर ना. काळभोर, राजेंद्र य. काळभोर, हेमंत गायकवाड (अध्यक्ष, अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट), युवराज काळभोर (अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती), पै. मनोज काळभोर (कळंबा केसरी) यांच्यासह सहकार, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच वंदनाताई प्रशांतदादा काळभोर (माजी सरपंच), हेमा मिलिंद काळभोर (संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना), बाळासाहेब ज. काळभोर, पांडुरंग केसकर, गुरुदेव काळभोर, संजय लक्ष्मण काळभोर, अमोल कोळपे, रमेश भोसले (शिवसेना जिल्हा संघटक), संतोष भोसले (शिवसेना लोणी काळभोर प्रमुख), राजाभाऊ पिंगळे (रासप), चिमाजी केसकर, दत्ता केसकर, राहुल भाऊ काळभोर, गणेश कांबळे, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य-सदस्या व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी एस. एन. गवारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन पाहिले.
या वेळी जिल्हा नियोजन निधीतून लोणी काळभोर कुस्ती आखाडा उभारणीसाठी २० लाख रुपये, बाजारमळा येथील संजय काळभोर घर ते विठ्ठल काळभोर घर रस्ता करण्यासाठी १० लाख रुपये, लोणी काळभोर गावठाण अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणासाठी ८२ लाख रुपये, सिद्राममळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्ती व भौतिक सुधारण्यासाठी २० लाख रुपये, आष्टापुरे मळा येथील शांतीकिरण सोसायटी रस्त्यासाठी ५० लाख रुपये, साईबाबा मंदिरासमोरील कंपाऊंड वॉल व कॉक्रीटीकरणासाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जनसुविधा निधीतून टायग्रीष स्कूल परिसरातील रस्त्यासाठी १५ लाख रुपये तर ग्रामनिधीतून बाबू थोरात घर ते रामदरा रोड रस्ता, जुना कॅनॉल ते बाळा वगरे घर रस्ता, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर स्मारक सुधारणा तसेच राजू इनामदार ते वसिम इनामदार घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉकची कामे प्रस्तावित आहेत.
रामदरा रोडवरील नवीन कॅनॉल पुलामुळे लोणी काळभोर व परिसरातील दळणवळण अधिक सुरक्षित व सुरळीत होणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य-सदस्या, अधिकारी-कर्मचारी, समस्त ग्रामस्थ तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
Editer sunil thorat



