
लोणी काळभोर (ता. हवेली) : पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता लोणी स्टेशन चौक येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात एमआयटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
सध्याच्या डिजिटल युगात वाढत चाललेल्या ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील गुन्हे, ओटीपी व बँकिंग फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून महत्त्वपूर्ण संदेश दिला. नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, संशयास्पद लिंक, कॉल किंवा मेसेजपासून दूर कसे राहावे, याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रवी आहेर, बापू वाघमोडे, विशेष शाखेच्या महिला पोलीस हवालदार होले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, सपकाळ, कदम, वाहतूक शाखेचे अंमलदार तसेच एमआयटी विद्यापीठाचे प्रा. पाटील, कांबळे आणि एमआयटीचे एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांमुळे सायबर गुन्ह्यांबाबत समाज अधिक सजग होईल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



